Amravati ST Bus And Auto Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : एसटी बसची ऑटोला धडक, भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये शाळकरी मुलाचा समावेश

Amravati ST Bus And Auto Accident News : अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर एसटी बस आणि ऑटोच्या भीषण धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू. मृतांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश असून पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमरावतीतील वरुड-राजुरा रोडवर भीषण अपघात

  • एसटी बस आणि ऑटोच्या धडकेत चार जणांचा मृत्यू

  • मृतांमध्ये शाळकरी मुलांचा समावेश

  • पोलिस तपास सुरू

अमोल घटारे,अमरावती

अमरावतीत भीषण अपघात झाला आहे. एस टी बस आणि ऑटोच्या धडकेत शाळकरी मुलांसह अन्य तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, जखमी उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे. सदर घटना सकाळच्या सुमारास जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर घडली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील मुलं हे आठवणी वरुडला रिक्षाने जात होते. या रिक्षामध्ये काही स्थानिक नागरिक देखील होते.

दरम्यान वरुड-राजुरा बाजार रोडवर प्रवाशांनी भरलेली एस टी बस आणि ऑटो यांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती कि रिक्षाचा चक्काचूर झाला. आणि रिक्षातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, जखमी उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून नेमकं काय घडलं? आणि कोणाची अपघात कशामुळे झाला याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT