Amravati Accident Saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident : अवैध जनावरे घेऊन जाणारे भरधाव वाहन पलटी; चालक व ६ जनावरांचा मृत्यू

Amravati News : दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजता सुमारास अशाप्रकारे भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा यामुळे होत आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : जनावरांची अवैध तस्करी सुरूच आहे. अशाच प्रकारे अवैध जनावरे घेऊन जात असताना वाहन (Accident) पलटी झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोळेगाव (Amravati) फाटा येथे घडली. यात चालक व गाडीतील ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

गाडीत जनावरांना कोंबून अवैध वाहतूक केली जात होती. हे वाहन दर्यापूर- अकोला (Akola) मार्गाने जात होते. भरधाव वेगाने वाहन जात असल्याने वाहनाचे टायर फुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन गाडी पलटी झाल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनातील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तर पलटी झालेले वाहन जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच या अपघातात सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य जनावरे जखमी झाले आहेत. जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला. काही काळासाठी मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजता सुमारास अशाप्रकारे भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा यामुळे होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

SCROLL FOR NEXT