Accident News: पुण्यात दोन अपघातांत ३ ठार, २ गंभीर जखमी

Pune Accident: पुण्यामध्ये दोन अपघातांच्या घटनेमध्ये तीनजण ठार झाले आहेत, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident News
Accident NewsSaam Tv
Published On

Pune Accident News

पुण्यात दोन भीषण रस्ते अपघात झाले आहेत. पहिला अपघात बोपदेव घाटात झाला आहे. (Pune) बोपदेव घाटात मोटार उलटून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवलेवाडीजवळ बोपदेव घाटात भरधाव मोटार उलटून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (latest accident news)

विशाल धारासिंह राठोड (वय १९, रा. येवलेवाडी, कोंढवा) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर विल्यम रवींद्र मेहेंदळे याच्यासह मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे. मोटारचालक गणपत ऊर्फ अभिषेक गायकवाड (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भरधाव मोटार उलटली

विशाल त्याचा मित्र विल्यम आणि गणपत हे तिघेजण मोटारीतून निघाले होते. बोपदेव घाटात मध्यरात्री दोन वाजण्याच्या भरधाव मोटार उलटली. या अपघातात मोटारीतील तिघेही गंभीर जखमी (Pune Accident) झाले होते. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलविण्यात आलं. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

पुणे- पानशेत रस्त्यावर अपघात

अपघाताची दुसरी घटना पुणे-पानशेत रस्त्यावर घडली आहे. पुणे- पानशेत रस्त्यावर भीषण अपघात झालाय. खडकवासला चौपाटीच्या पुढील बाजूला एमइएस कॅन्टीन बसथांबा परिसरात टेम्पोने दुचाकी व पायी चालणाऱ्यांना धडक दिलीय. या घटनेत पायी चालणारी व्यक्ती आणि दुचाकी चालक या दोघांचा मृत्यू झाला (Accident News) आहे.

Accident News
Akola Accident News : मित्राच्या लग्नाला गुजरातहून आलेल्या कारला अकाेल्यात अपघात, एकाचा मृत्यू, चाैघे जखमी

टेम्पोने धडक दिली

विनायक दिलीप भगत (वय३२, रा.भगतवाडी बहूली सध्या- कोंढवे धावडे) व पांडुरंग शंकर रणधीर (वय ७१, रा.जयहिंद नगर, खडकवासला) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत (Accident) आहेत.

पुण्यात रस्ते अपघातांचं (road accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांचा भरधाव वेग, चुकीच्या बाजूने वाहने चालविणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांकडून वाहनं योग्य प्रकारे चालविण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसंच वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठीही सांगण्यात येत आहे.

Accident News
Accident CCTV : भरधाव बसच्या चाकाखाली स्कुटी सापडली, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, अपघाताचा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com