Three people died and nine were injured in a horrific collision between a bus and a cruiser on Paratwada-Anjangaon  
महाराष्ट्र

Amravati Accident : भीषण अपघात; बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू , ९ प्रवासी जखमी

Amravati us And Cruiser Accident: अमरावतीच्या परतवाडा-अंजनगाव रस्त्यावर बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जण गंभीर आहेत. पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे.

Bharat Jadhav

  • अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अंजनगाव रोडवर भीषण अपघात झालाय.

  • बस आणि क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली आहे.

  • नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अंजनगाव रोडवर भीषण अपघात झाला आहे. बस आणि क्रूझर गाडीची समोरासमोर धडक झाली असून यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अजून समजलेले नाही.

दरम्यान अपघात झाल्यानंतर स्थानिकांची घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. क्रूझर गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला होता. गाडीचा समोरील भाग पूर्णपणे तुटला होता. चालक स्टेरिंग आणि सीटात अडकला होता. स्थानिक त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी पंचनामा करत अपघात कशामुळे झाला याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची घेतली भेट

BJP Leader Shot : भाजप नेत्यावर दिवसाढवळ्या धाडधाड गोळ्या झाडल्या, ५ जण घरात घुसलं अन्...

Ahmednagar Tourism : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला खूप आवडते? मग, अहमदनगरमधील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट

Manoj Bajpayee : "फोटो खिंचवाने थोडी आये है..."; मनोज बाजपेयी पापाराझींवर संतापले, पाहा VIDEO

WhatsApp Account: आता एक WhatsApp अकाउंट चार डिव्हाइसवर चालेल, करा 'या' काही सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT