Raj Thackeray Speech  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray Speech: 'धन्य त्यांची हास्यजत्रा...' राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीची खोचक टीका

MNS Padwa Melava: काल दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा पाडवा मेळावा पार पडला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amol Mitkari On Raj Thackeray Speech: काल दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर मनसेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा पार झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सध्या राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना राजकीय नेत्यांनी राजकारणाचा विचका करुन ठेवल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी ६ जून रोजी रायगडावर जाणार असल्याचेही सांगितले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभेवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले अमोल मिटकरी...

राज ठाकरेंच्या या भाषणाची अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करत खिल्ली उडवली आहे. "धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुन ला "रायगड" जाणार असं समजल, पण हे महाशय गड चढुन जाण्याची हिम्मत करतील का ? कसं आहे ,गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे," असे म्हणत राज ठाकरेंच्या भाषणावर खोचक टीका केली आहे.

ठाकरे गटानेही केली टीका....

दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "मुळात जुन्या कढीला आलेला हा ऊत दिसतोय. २०-२५ वर्षांनंतर हे साक्षात्कार बाहेर येत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोंडी केलेली दिसतेय. त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही असं महाराष्ट्रात चित्र दिसतंय," अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांच्याकडून राज ठाकरेंच्या सभेवर टीका करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Nagpur : शेतात कामाला जाताना कारने चिरडले, २ महिलांचा जागीच मृत्यू

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून या राशींचं नशीब चमकणार; शनीदेव मार्गी होऊन मिळवून देणार भरपूर पैसा

A. R. Rahman: शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते...; वडिलांच्या आठवणीत भावूक झाले एआर रहमान, सांगितला 'तो' किस्सा

SCROLL FOR NEXT