Amol Kolhe Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe: ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत...; अमोल कोल्हेंचं आढळराव पाटलांवर टीकास्त्र

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil: आढळराव यांना शुभेच्छा. ते एक वयस्कर नेते आहेत डिजिटल युगाशी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे कुणीतरी त्यांना माझे फेसबूक पेज दाखवावे, अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Ruchika Jadhav

Political News:

राज्याच्या राजकारणात सध्या शिरूर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीत टक्कर देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आढळराव पाटील इच्छूक असल्याच्या चर्चा आहेत. यावरून कोल्हे आणि आढळराव पाटील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच आढळराव पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज पुण्यातून राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरूवात झाली असून माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हेंनी आढळराव पाटीलांवर टीकास्त्र सोडलं आहे. "आढळराव पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आढळराव यांना शुभेच्छा. ते एक वयस्कर नेते आहेत डिजिटल युगाशी त्यांचा संबंध नाही. त्यामुळे कुणीतरी त्यांना माझे फेसबूक पेज दाखवावे. माझ्या सर्व कामांची माहिती तेथे आहे.", अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते आढळराव पाटील?

जनता गेल्या ५ वर्षांपासून आक्रोश करत होती. मात्र खासदार तेव्हा जराही जनतेत आले नाहीत, साधे फिरकलेही नाहीत. आता आगामी निवडणुकांमुळे आक्रोश यात्रा काढत आहेत, अशी टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, "२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकते तर खणाऱ्यांना रास्त किंमतीत उपलब्ध करून त्यावर सबसिडी मिळावी. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे.

कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आमची मागणी आहे."

"निवडणूक हा गौण भाग आहे. मिळणाऱ्या पदाला काय चाटायचे आहे का? आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नां संदर्भात आहे. कोणी ही यात्रा रोखू शकणार नाही.", असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT