Amit Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Amit Thackeray : पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे मैदानात; उद्या नवी मुंबईत साधणार तरुणांशी संवाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडूनही राज्यातील विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. अमित ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी करिता उद्या नवी मुंबईत महासंपर्क दौरा करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

नवी मुंबई : शिवसेनेत झालेल्या ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडूनही राज्यातील विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. अमित ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी करिता उद्या नवी मुंबईत महासंपर्क दौरा करण्यात येणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची आपआपल्या पक्षासाठी प्रतिष्ठा पणाला लागल्याची पाहायला मिळत आहे. (Amit Thackeray News In Marathi)

काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांचा कोकण दौरा संपला. त्यानंतर पालघर , आणि ठाणे जिल्ह्यात अमित ठाकरे यांचा दौरा सुरू असून नवी मुंबई शहरात सोमवार, दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या महासंपर्क दौऱ्याला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सैनिकांकडून सकाळी साडेदहा वाजता अमित ठाकरे यांचं वाशी टोलनाक्यावर जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह जल्लोषात, फटाक्यांच्या आतिष बाजीने तसेच घोषणा देत अमित ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे आगमनाची तयारी मनसेकडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमित ठाकरे यांच्या महासंपर्क दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

त्यानंतर वाशीतील गुरव ज्ञाति हॉल येथे अमित ठाकरे मनविसेत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी शेकडो तरुण तरुणींचा अमित ठाकरे यांच्या हस्ते मनविसेत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली. त्यानंतर अमित ठाकरे हे विद्यार्थी सेना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत असल्याचे गजानन काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू, पाकिस्तानच्या पत्रकाराचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update : राज्यसभेत अमित शहांना बोलवा - मल्लिकार्जुन खर्गे

रक्षाबंधन सण येतोय! लाडक्या भावासाठी बनवा सुंदर १ ग्रॅम चांदीच्या राख्या

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Ram Mandir: तुम्ही जानवे घालता, मांसाहार करता का? राम मंदिराच्या CEO पदाच्या उमेदवारांना विचारले गेले १८ प्रश्न

SCROLL FOR NEXT