Ambarnath Accident News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Accident News: रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक, वृद्धेचा मृत्यू

रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक, वृद्धेचा मृत्यू

अजय दुधाणे

उल्हासनगर : पहाटे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्‍या रिक्षाने धडक (Accident) दिल्‍याने वयोवृद्ध आजीबाईचा मृत्यू (Death) झाला. ताराबाई पावलास काळूसे असे मयत आजीबाईच नाव आहे. (Tajya Batmya)

अंबरनाथमधील (Ambarnath) फॉरेस्ट नाका परिसरात ही घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आजी ताराबाई काळूसे या रस्ता ओलांडताना अचानक भरधाव येणाऱ्या रिक्षाने त्यांना धडक मारली. यात ताराबाई गंभीर जखमी झाल्‍या होत्‍या. अपघातानंतर ताराबाईला उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला.

घटना सीसीटीव्हीत कैद

फाॅरेस्ट नाका परिसरातील ही घटना असून संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान नातेवाईकांनी या घटनेची तक्रार अंबरनाथ पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी रिक्षा चालकाला शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विलेपार्ले येथील जैन मंदिरावर के-पूर्व प्रभाग कार्यालयाने केलेली तोडक कारवाई योग्यच

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dark Circle Removal Tips: बर्फ लावल्याने खरचं डार्क सर्कल गायब होतात का? जाणून घ्या सत्य

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

SCROLL FOR NEXT