Sudhir Mungantiwar News: मुख्‍यमंत्री व्‍हायचे असेल तर ‘मविआ’तून बाहेर पडा; सुधीर मुनगंटीवार यांची नाना पटोलेंवर निशाणा

मुख्‍यमंत्री व्‍हायचे असेल तर ‘मविआ’तून बाहेर पडा; सुधीर मुनगंटीवार यांची नाना पटोलेंवर निशाणा
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSaam tv

सिद्धेश म्‍हात्रे

मुंबई : बॅनर वर भावी मुख्यमंत्री लिहून कुणालाही मुख्यमंत्री होता येत नाही. यासाठी जनतेच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. नाना पटोले (Nana Patole) यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर प्रथम त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल; अशा शब्‍दात मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नाना पटोले यांच्‍यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Sudhir Mungantiwar
Sambhaji Nagar News: चक्क फिरते गर्भलिंग निदान केंद्र, फोन करताच डॉक्टर नर्ससह पोचायचा घरी; वाळूज पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

अखिल विश्व गायत्री परिवाराच्यावतीने नवी मुंबईत अश्वमेध महायज्ञाचे आयोजन खारघर येथे कारण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आज राज्यपाल रमेश बैस आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांच्‍या भावी मुख्‍यमंत्रीच्‍या बॅनरवरील फोटोवर प्रतिक्रीया दिली.

Sudhir Mungantiwar
Gulabrao Patil Statement: संजय राऊत यांची त्या कृत्यावरून संस्कृती कळतेय; गुलाबराव पाटील यांचा हल्लाबोल

कितीही प्रयत्‍न केले तरी युती कधीही तुटणार नाही

आमची युती अंबूजा सिमेंटपेक्षा मजबूत असून आमची युती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला, तरी ती तुटणार नाही; असे वक्तव्य केले. सोबतच बॅनरवर भावी मुख्यमंत्री यावर आपली प्रतिक्रीया दिली. नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर प्रथम त्यांना महाविकास आघाडीतून (Mahavikas Aaghadi) बाहेर पडावं लागेल. कारण माहविकास आघाडीमध्ये अनेक लोक मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत आहेत; अशी टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com