Raj Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Raja Shivchhatrapati: राज ठाकरेंना अमरजित पाटलांनी दिलं आव्हान, म्हणाले...!

आता शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे माहितीपर खंड प्रकाशित करावे यासाठी एक इतिहास तज्ज्ञांची समिती तयार करावी.

भारत नागणे

पंढरपूर : राज ठाकरे (raj thackeray) हे सातत्याने बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे चरित्र घरोघरी नेले असा दावा करतात. याचा अर्थ जेम्स लेनला (james lane) पुस्तक लिहण्यास मदत करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना त्यांच्याकडून क्लीन चिट दिली जात आहे. तेच या बदनामीच्या कटात सहभागी आहेत असा खळबळजनक आरोप पंढरपूर मधील शिवचरित्र अभ्यासक आणि भांडारकर संस्थेवरील हल्ला प्रकरणातील सहभागी अमरजित पाटील (amarjeet patil) यांनी येथे (pandharpur) केला आहे. अमरजित पाटील यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्र नव निर्माण सेना (mns) आणि संभाजी ब्रिगेड (sambhaji brigade) आमने सामने येण्याची शक्यता आहे. (raj thackeray latest marathi news)

अमरजित पाटील म्हणाले जेम्स लेनला मदत करणाऱ्या एस. एस. बहुलकर यांना त्यावेळी शिवसैनिकांनी (shivsainik) काळे फासले होते. त्यावर राज ठाकरे यांनी बहुलकर यांच्या घरी जाऊन शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली होती. त्यामुळे राज ठाकरे सुद्धा या बदनामीच्या कटात साक्षीदार झाले आहेत.

यापूर्वी पुरंदरे यांना चर्चेत हरवले आहे आणि त्यांच्याकडून माफीनामा देखील घेतला आहे. आता राज ठाकरेंनी जेम्स लेन आणि भांडारकर संस्था मधील पुरंदरे लिखित राज शिवछञपती (raja shivchhatrapati) यावर खुली चर्चा करावी असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. सातत्याने कोणीही उठ सुठ चुकीची विधाने करत असेल आणि यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होत असेल तर आता शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे माहिती पर खंड प्रकाशित करावे यासाठी एक इतिहास तज्ज्ञांची समिती तयार करावी. अधिकृत पुरावे गोळा करून योग्य माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र तयार करावे अशी मागणी श्री. पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT