Amaravati Saam
महाराष्ट्र

Crime News: 'दुसरीपण मुलगीच..' पती अन् सासरच्या मंडळींकडून छळ; हेल्थ ऑफिसर महिलेनं घरातच आयुष्य संपवलं

Womans Death in Amaravati: पुण्यातील प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुभांगी तायवाडे या महिलेनं पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहितेने पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. महिलेनं आपल्या राहत्या घरातच पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू - सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना, अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जय भोले कॉलनीत घडली. शुभांगी तायवाडे (वय वर्ष ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शुभांगी या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदावर कार्यरत होत्या, तर त्यांचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शुभांगीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.

दुसरी मुलगी झाली म्हणून पती आणि सासरच्या मंडळींनी मिळून शुभांगीचा छळ केला जात होता, असा आरोप शुभांगीच्या आई वडिलांनी केला. शुभांगीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीचा पती निलेश आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणानंतर शुभांगीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. गाडगे नगर पोलिसांनी निलेश तायवाडे आणि त्यांच्या सासू-सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभांगीच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT