31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार :  अजित पवार
31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार : अजित पवार  saam tv
महाराष्ट्र

31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार : अजित पवार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monsoon session of Maharashtra Legislative Council : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात काल पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सभागृहात स्वप्नील लोणकरने लिहिलेले पत्र वाचून दाखवले. तसेच पुन्हा कोणत्याही स्वप्नील लोणकरने (Swapnil Lonkar) आत्महत्या करू नये यासाठी mpsc चा कारभाराकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (All vacancies of MPSC to be filled by July 31: Ajit Pawar)

या पार्श्वभूमीवर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यसरकार 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. तसेच त्यासाठी एमपीएससी परीक्षेसंदर्भात राज्य सरकार समितीची स्थापना करणार आहे. तसेच ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी चांगलाच हल्लाबोल केला.

mpscस्वायत्त संस्था आहे. मात्र राज्यसरकार, mpsc दोन-दोन वर्षे घेत नाही. mpscच्या बोर्डावर अध्यक्ष नाहीत, कोरोना महामारीमुळे अनेक उमेदवार निराश झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. mpsc ने पोस्ट न दिल्याने, परीक्षा न घेतल्याने अनेक उमेदवारांनी आंदोलने केली, मात्र mpsc ने कोणालाही पोस्ट दिली नाही. राज्यसरकारकडे अनेकदा विणवण्या करूनही राज्यसरकारने देखील काहीच निर्णय घेतला नाही. असं आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याच बरोबर त्यांनी राज्यसरकारने सर्व कामकाज बाजूला ठेवून mpsc च्या कारभरावर चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अमित शाह यांच्या Deepfake व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT