पावसाळी आधिवेशन: देवेंद्र फडणवीस विधानसभेत सभागृहात आक्रमक
पावसाळी आधिवेशन: देवेंद्र फडणवीस विधानसभेत सभागृहात आक्रमकsaam tv

पावसाळी आधिवेशन: देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक

कोरोना महामारीमुळे अनेक उमेदवार निराश झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात.

राज्याचे विधानपरिषदेचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Council Monsoon Session) आजपासून सुरु झाले. मात्र अधिवेशन सुरु होण्यापुर्वीच विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनपूर्वी ओबीसी आरक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि शेतीच्या मुद्दय़ांवर निषेध केला. भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी आणि बॅनर लावून महाराष्ट्र विधानसभेबाहेर निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडमोडी आणि वर्तवलेले अंदाज पाहता विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर चांगलीच टीका केली. (Monsoon session: Devendra Fadnavis became aggressive in the hall)

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. अधिवेशनात प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप व्यक्त केला.

तसेच, राज्यसरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली. तसेच त्यांनी यावेळी बोलताना पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्वप्नील लोणकर ने केल्या आत्महत्येचा मुद्दा उचलला. स्वप्नील लोणकरने लिहिलेले पत्र वाचून दाखवले. तसेच पुन्हा कोणत्याही स्वप्नील लोणकरने आत्महत्या करू नये यासाठी mpsc चा कारभारकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पावसाळी आधिवेशन: देवेंद्र फडणवीस विधानसभेत सभागृहात आक्रमक
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते पद बदलणार? राहुल गांधींच्या नावाची चर्चा

mpscच्या बोर्डावर अध्यक्ष नाहीत, mpscस्वायत्त संस्था आहे. मात्र राज्यसरकार, mpsc दोन-दोन वर्षे परीक्षा घेत नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी परीक्षा झाली होती. त्यांचे अद्याप निकाल लागलेले नाहीत. ज्यांचे निकाल लागले आहेत, त्यांना अद्याप पोस्ट दिलेल्या नाहीत. कोरोना महामारीमुळे अनेक उमेदवार निराश झाले आहेत. त्यामुळे ते आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. mpsc ने पोस्ट न दिल्याने अनेक, परीक्षा न घेतल्याने अनेक उमेदवारांनी आंदोलने केली, मात्र mpsc ने कोणालाही पोस्ट दिली नाही. राज्यसरकारकडे अनेकदा विणवण्या करूनही राज्यसरकारने देखील काहीच निर्णय घेतला नाही. असं आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याच बरोबर त्यांनी राज्यसरकारने सर्व कामकाज बाजूला ठेवून mpsc च्या करभरवर चर्चा करावी असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com