-- राजेश भोस्तेकर
रायगड : रायगड पोलीस दलातर्फे जिल्ह्यात रेझिंग डे साजरा केला जात आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत रेझिग डेच्या निमित्ताने आज समुद्रकिनारी रायगड (Raigad) जिल्हा पोलिस बँड पथकाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग (Alibag) यांनीही पोलीस विभागाच्या कार्याची माहिती ऑन ड्युटी 24 तास या पथनाट्यातून सादर केली. जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून रेझिंग डे (Police Raising Day) च्या माध्यमातून पोलिस दलाकडून वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत.
हे देखील पहा :
पोलीस (Police) हा जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. पोलीस कर्मचारी, अधिकारी हे 24 तास आपली सेवा जनतेसाठी देत असतात. सण, सणवार, आंदोलन, मोर्चे, नैसर्गिक आपत्ती काळात पोलीस हा नेहमीच पुढे असतो. पोलीस विभाग हा आपले कार्य कशा प्रकारे करत आहे याबाबत रेझिंग डेच्या निमित्ताने प्रिझम संस्थेमार्फत पथनाट्यातून सादर केले.
ऑन ड्युटी 24 पथनाट्यातून महिला सुरक्षा, पोलीस काका, दीदी, 112 हेल्प लाईन, पोलीस मित्र याबाबत जनतेला माहिती दिली. त्याचबरोबर सायबर (Cyber) गुन्ह्याबाबत ही जनजागृती अलिबाग समुद्रकिनारी करण्यात आली. रेझिंग डे च्या निमित्ताने अलिबाग समुद्रकिनारी रणगाडा ठिकाणी पोलीस बँड पथकाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक पर्यटक यावेळी उपस्थित होते.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.