Beed : उस गाळपाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पाच कारखाने बंद, खासगी साखर कारखानदारांची मनमानी, गाळपाचा प्रश्न ऐरणीवर !
Beed : उस गाळपाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
Beed : उस गाळपाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशाराSaamTvNews

बीड : बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात तब्बल 2 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आलीय. यामुळे आता ऊस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खासगी साखर कारखाना (Sugar Factory) ऊस घेऊन जात नसल्याने थेट उसाचा फड पेटवून आत्मदहन करण्याचा इशारा माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

हे देखील पहा :

जय महेश शुगर NSL पावारवाडी हा कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने, माजलगाव तालुक्यातील लुखेगावचे शेतकरी (Farmer), नयूम खान वाहेद खान पठाण व रतन एकनाथ वानखेडे या दोन शेतकऱ्यांनी, स्वतःचा ऊस पेटवून त्यात आत्मदहन करण्याचा इशारा लेखी निवेदनातून कारखाना व प्रशासनास दिल्याने खळबळ उडाली. कारखाना ऊस घेऊन जात नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा ठाकला आहे. या विरोधात सोमवारी शेतकऱ्यांनी बैल गाडी मोर्चाचा इशारा दिला आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात एकूण 11 साखर कारखाने आहेत. त्यामध्ये 4 खाजगी आहेत, तर 7 सहकारी साखर कारखाने आहेत. त्यामध्ये 2 सहकारी साखर कारखाने चालू असून 5 सहकारी साखर कारखाने बंद आहेत. नव्याने वैद्यनाथ सहकारी कारखाना परळी (Parli), अंबा सहकारी साखर कारखाना अंबाजोगाई , सुरू करण्याचे प्रयत्न असून अद्याप सुरू झाले नाहीत. तर केज तालुक्यातील विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर, गजानन सहकारी साखर कारखाना बीड, कडा सहकारी साखर कारखाना कडा तालुका आष्टी, हे बंद आहेत.

Beed : उस गाळपाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या !

तर, खाजगी साखर कारखानेमध्ये येडेश्वरी शुगर मिल्स केज ,शिवछत्रपती साखर कारखाना माजलगाव ,जय महेश शुगर इंडस्ट्रीज माजलगाव, भीमाशंकर शुगर इंडस्ट्रीज चौसाळा, हे चार कारखाने खाजगी तत्त्वावर चालू आहेत. त्याचबरोबर 5 सहकारी साखर कारखाने बंद असल्याने शेतकऱ्यांना ऊस हा खाजगी कारखान्यावर घालावा लागत आहे. त्यामुळे साखर कारखानदारांची मनमानी या ठिकाणी चालत असल्याचं चित्र निर्माण झालंय.

बीड जिल्ह्यात उसाचे क्षेत्र अतिरिक्त झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडेल आहेत. जिल्ह्यातील जे सहकारी साखर कारखाने आहेत ते नुसते नावाला सहकारी साखर कारखाने आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन ठेवल्या असून केवळ स्ट्रक्चर उभे केले आहेत. 4-2 गाळप करून कारखाने बंद आहेत. या कारखान्याचे जे कर्तेधर्ते संचालक मंडळ आहे, त्यांनी फक्त राजकारणासाठी आणि सहकार्यासाठी कारखाण्याचा वापर केल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत

Beed : उस गाळपाचा प्रश्न पेटला; शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा
KDMC परिसरात सोसायट्यांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे!

बीड जिल्ह्यातील कडा सहकारी साखर कारखाना, गजानन सहकारी साखर कारखाना , आंबा सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखाना केज हे कारखाने अद्यापही सुरू नाहीत. शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा विचार करता हे कारखाने तात्काळ सुरू करायची गरज आहे.

या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जो ऊस आहे, तो ऊस इतर कारखाने नेण्यास टाळाटाळ करत आहेत. आणि जे खाजगी चालू कारखाने आहेत, त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातला पाऊस संपत नाही. त्यामुळे आज उसाचा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. सरकारने व साखर आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी शेतकरी संघटने नेते मोहन गुंड यांनी केली आहे. तसेच सहकारी साखर कारखाने तात्काळ सुरू करावेत. अशी मागणी कालिदास अपेट यांनी केली आहे.

दरम्यान, सहकारी साखर कारखाने लवकर सुरू नाही झाले तर बीड जिल्ह्यामध्ये ऊस प्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जाण्यास नकार देत असल्यामुळे, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहत आहे. तसेच जास्त दिवस ऊस तोडणी करून घेऊन गेल्यामुळे, त्याच्या वजनामध्ये व रिकवरीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने, तात्काळ साखर कारखाने सुरू करावेत. अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com