Alibag News Saam tv
महाराष्ट्र

Alibag News: मेडिकल कॉलेजला ॲडमिशन देण्याच्या नावाने फसवणूक: टोळी रायगड पोलिसांच्या ताब्यात

Raigad Alibag News : मेडीकल कॉलेजला ॲडमिशन देण्याच्या नावाने फसवणूक: टोळीला रायगड पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

सचिन कदम 
अलिबाग
: नोकरी लावून देण्याचा बहाणा, कॉलेजला प्रवेश घेऊन देण्याच्या नावाने फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार (Alibag) अलिबागमध्ये समोर आला असून मेडीकल कॉलेजला ॲडमिशन मिळवून देण्याच्या नावाने अनेकांची (Fraud) फसवणूक झाली आहे. फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. (Live Marathi News)

अलिबाग येथील मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवुन देतो असे आमिष दाखवून ३२ लाख ५० हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. कोल्‍हापूर येथील अभिजीत वानिरे यांच्‍या मुलीला अलिबागच्‍या मेडीकल कॉलेजमध्‍ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो असे सांगून या टोळक्‍याने ३२ लाख ५० हजार रूपये उकळले होते. या टोळीतील चार जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ दास, सोमेन मन्‍ना, सोमेश बिरा आणि अभिषेक कुमार रज्‍जाक अशी आरोपीतांची नावे आहेत. 

२५ लाखाचा मुद्देमाल जप्त 

आरोपींकडून २० लाखांची रोकड आणि मोबाईल, एक गाडी मिळून २५ लाखांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी हस्‍तगत केला आहे. त्‍यांचे अन्‍य तीन साथीदार अद्याप फरार असून पकडलेल्या आरोपींना ८ ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT