GBS Case Found In Jalgaon Meta Ai
महाराष्ट्र

GBS Case Outbreak: सावधान! पुण्यात 4 जणांचा बळी घेणाऱ्या GBS सिंड्रोमची जळगावमध्ये एन्ट्री; पुणे शहरातही रुग्णांचा आलेख वाढता

GBS Case Found In Jalgaon: कुठलीही "ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका महिलेला जीबी सिंड्रोम हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Bharat Jadhav

पुण्यात जीबी विषाणूने थैमान घातले असून आतापर्यंत तब्बल चार जणांचे बळी या आजाराने घेतलाय. रोज रुग्णांची संख्या वेगानं वाढत चालली आहे. आज एकाच दिवसात पुण्यात १० रुग्णांची नोंद करण्यात आली असून हा आजाराने आता खान्देशातही प्रवेश केलाय. जीबीएस सिंड्रोम आजाराचा एक रुग्ण जळगावमध्ये आढळून आला आहे. जळगाव जिल्ह्यातील एका ५० वर्षीय महिलेला जीबीएल सिंड्रोम आजार सदृश्य लक्षणे आढळली आहेत. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यात जीबी सिंड्रोम आजारामुळे एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झालाय. पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय तरुणाचा तर पुण्यातील नांदेड गावातील एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू झालाय. या आजाराने राज्यात आतापर्यंत ४ जणांचा जीव गेलाय. त्यामुळे या आजाराची भीती वाढली आहे. पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आज झालेल्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेवर १५ दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. नांदेड गावातली या महिलेला ब्लड प्रेशरचा त्रास होता.

त्यामुळे काही दिवस पुण्यातील खासगी रुग्ण्यालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तर या आजाराने पुण्यानंतर आता खान्देशात प्रवेश केलाय. जळगावमध्ये एक रुग्ण आढळून आलाय. विशेष म्हणजे कुठलीही "ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या उपचार सुरू आहेत. सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही.

तसेच, राहत्या घरीच ही अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेलं असून महिलेची प्रकृती स्थिर आहे.

पुण्यात आज एकाच दिवशी दोघांचा मृत्यू

पुण्यात जीबी सिंड्रोम आजारामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय तरुणाचा तर पुण्यातील नांदेड गावातील एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराने राज्यात आतापर्यंत ४ जणांचा बळी घेतले आहेत.

पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंखेचा आलेख वाढताच

एकाच दिवसात १० रुग्णांची वाढ

रुग्णांची एकूण संख्या १४० वर

१८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे

९८ रुग्णांची जीबीएसचे रुग्ण म्हणून निश्चिती झाली आहे

२६ रुग्ण पुणे मनपा

७८ रुग्ण (सिंहगड रोड, नांदेड गाव, किरकिटवाडी )

१५ पिंपरी चिंचवड

१० पुणे ग्रामीण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

SCROLL FOR NEXT