Pune GBS News : जीबी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी, पुण्यात रूग्णांची संख्या वाढतेय

Pune GBS News : पुण्यात जीबीएसच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. पुण्यात सध्या १२७ रूग्णांची नोंद आहे. राज्यातील जीबीएसमुळे दोन जणांचा मृत्यू झालाय.
Pune GBS News
Pune GBS News
Published On

Pune GBS News : जीबीएस आजाराने पुण्यात थैमान घातले आहे. येथे जीबीएस आजाराच्या रूग्णांची संख्या १२७ वर पोहचली आहे. जीबीएस आजारामुळे राज्यात दुसरा बळी गेलाय. पहिला मृत्यू सोलापूरमध्ये झाला होता, तर दुसरा मृत्यू पुण्यात झालाय. सोलापुरात मृत्यू झालेल्या रूग्णांच हिस्ट्री पुण्यातीलच आहे. त्याला पुण्यात जीबीएस आजार झाला होता.

बुधवारी पुण्यात जीबीएस आजारामुळे एकाचा मृत्यू झालाय. ससूनमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुण्यातील जीबीएस आजाराच्या रूग्णांची संख्या १२७ वर पोहचली आहे. राज्यातील गुइलेन बॅरे म्हणजे जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून,आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Pune GBS News
GBS Cases in Pune : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'ची धास्ती वाढली; पुण्यात रुग्णांची शंभरी पार, कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

सोलापूरात दोन-तीन दिवसांपूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यात मृत्यू झालेला हा दुसरा रुग्ण ठरला आहे.

Pune GBS News
Pune GBS News : पुण्यात जीबीएसचं थैमान; एकाचा मृत्यू, केंद्र सरकार अलर्ट, पथक पाठवलं!

राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या आता १२७ झाली असून, त्यातील २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यातील रुग्णांमध्ये २३ रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, ७३ रुग्ण हे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत.

Pune GBS News
Pune GBS News : पुण्यात मेंदू व्हायरसचं थैमान सुरूच, जीबीएस रूग्णांची संख्या शंभरीपार, अनेकजण व्हेंटिलेटरवर

याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १३, पुणे ग्रामीणमधील ९ आणि इतर जिल्ह्यांतील ९ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ७२ रुग्णांचे जीबीएसचे निदान झालेले आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com