Akola Two Groups Clash  Saam tv
महाराष्ट्र

Akola Two Groups Clash : अकोल्यात पुन्हा वाद उफाळला; हरिहरपेठातील भरचौकात दुसऱ्यांदा राडा, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, VIDEO

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : अकोल्यामधील हरिहरपेठ भागात आज पु्न्हा दोन गटात वाद उफाळला आहे. या वादादरम्यान एका विशिष्ट समाजातील एक ते दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अकोल्यातील हरिहरपेठ भागात ७ ऑक्टोबर रोजी मोठा राडा झाला होता. त्यानंतर पुन्हा वाद उफाळल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या वादानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आज बुधावारी पुन्हा सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास किरकोळ वाद झाला होता. याच वादादरम्यान एकाला मारहाण झाल्याचे समजते आहे. दरम्यान या राडा संदर्भात माहिती मिळताच अकोल्यातील स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

या वादाची चर्चा वाऱ्यासारखी पसरताच एका विशिष्ट समाजातील जमाव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. त्या जमावालाही पोलिसांनी पांगवले आहे. अकोला पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ ठळला आहे. सद्यस्थितीत घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दंगाकाबू पथक यासह आरसीपीचे पथक तैनात आहे.

दरम्यान, अकोल्यातील हरिहरपेठ भागात सध्या संपूर्ण शांतता आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अमोल गोगे यांचा समावेश होता. दरम्यान 7 ऑक्टोंबर रोजी आणि आज झालेला किरकोळ वादाच्या घटनेनंतर हरिहर पेठ भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या सोबत शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. दुचाकीला ऑटो रिक्षाचा धक्का लागला आणि दोन्ही चालकांमध्ये हा वाद पेटला होता. त्यानंतर अकोल्यातील हरिहरपेठामध्ये पुन्हा वाद पेटल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. संपूर्ण हरिपेठमध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, संपूर्ण घटनेनंतर आता अकोला पोलिसांनी स्थानिक नागरिकांना शांततेच आवाहन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

News Policy For School Teachers : गाढव, घुबड आणि उंट...! विद्यार्थ्यांना टोमणे देणे होणार बंद, शिक्षकांच्या संतापावर मर्यादा

Delhi Politics: PWD कडून मुख्यमंत्री आवास सील; सीएम आतिशी यांच्या वस्तू काढल्या घराबाहेर , काय आहे प्रकरण

Marathi News Live Updates: कळंबोलीत धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन

IND W vs SL W: 'Do or Die' लढतीत हरमनप्रीत अन् स्म्रितीची अर्धशतकं! श्रीलंकसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान

Maharashtra Politics : हरियाणात भाजपचे मित्रपक्ष 'शुन्यावर'; रोहित पवारांचा काकांना सावधतेचा इशारा, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT