Akola News
Akola NewsSaam tv

Akola News : काम करताना विहीर खचली; विहिरीत ढिगाऱ्याखाली दबून शेतमजुराचा मृत्यू

Akola News : तब्बल दोन तासानंतर शेतमजुरांसह गावकऱ्यांच्या मदतीने सोनोने यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला
Published on

अक्षय गवळी 

अकोला : शेतात सोयाबीन तोडण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शेतातील विहिरीच्या जवळ काम करत असताना विहीर अचानकपणे खचली. यामुळे मातीचा ढिगारा व पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू झाला. सदरची दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील मुंडगाव या गाव शिवारात घडली. 

अकोला (Akola News) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव गावात आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पंजाब प्रल्हाद सोनोने असे या मृत शेतमजुराचे नाव आहे. शेतातल्या विहीर परिसरात सोयाबीन तोडत असताना अचानक विहीर खचली आणि थेट हा शेतमजूर विहिरीत कोसळला. खचलेल्या विहिरीच्या ढिगाऱ्याखाली ते दबले गेले. तसेच विहिरीत पाणी असल्याने पाण्यात बुडून या शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Akola News
Navi Mumbai Police : डिलिव्हरी बॉयकडून हप्ता घेणं पडलं महागात; नवी मुंबईतील 5 पोलीस तडकाफडकी निलंबित

सदर घटनेची माहिती गावात  ग्रामस्थ मदतीसाठी धावले. तब्बल दोन तासानंतर शेतमजुरांसह गावकऱ्यांच्या मदतीने सोनोने यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मुंडगाव येथील अनुकूल सांगोळे यांच्या शेतात सोयाबीन तोडत असताना ही घटना घडली आहेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com