Scene from Paras village in Akola where Sanghpal Khandare died by suicide after sharing a viral video blaming his in-laws. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

अकोल्यात धक्कादायक घटना, पत्नी-सासरच्यांच्या छळामुळे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, व्हिडीओतून गंभीर आरोप

Akola man commits suicide after alleging harassment by in-laws : अकोल्यात संघपाल खंडारे नामक तरुणाने आत्महत्या केली असून, त्यापूर्वी त्याने व्हिडीओद्वारे बायको व सासरच्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. आत्महत्येपूर्वी संघपालने भावाला एक भावनिक व्हिडीओ पाठवला ज्यामध्ये त्याने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली होती.

Namdeo Kumbhar

  • अकोल्यातील पारस येथे 30 वर्षीय संघपाल खंडारेने आत्महत्या केली.

  • आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून बायको व सासरच्यांवर छळाचा आरोप केला.

  • व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गावात हळहळ व्यक्त.

  • रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे.

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola Latest News Marathi : अकोल्यात एकाने आत्महत्यापूर्वी व्हिडिओद्वारे बायकोसह तिच्या सासरच्यांनी मारहाण अन छळ केल्याचा आरोप करीत टोकाचं पाऊल उचललंय. संघपाल खंडारे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीची नाव आहे.. त्याने आत्महत्यापूर्वी व्हिडिओ बनवत बायकोसह सासरच्यांनी मारहाण केल्याचा केलाय, अन रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. अकोल्यातल्या पारस या ठिकाणी संघपालने आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी त्याने विडिओमध्ये पत्नीसह सासरकडील 6 ते 7 लोकांनी आपल्याला मारहाण केली असल्याचाच आरोप केलाय. आत्महत्यापूर्वीच त्याने व्हिडिओ बनवला, अन सर्व नातेवाईकांना तो पाठवला आहे. सासरच्या लोकांपासून जीविताला धोका असल्याचे सांगत त्याने आयुष्य संपवलंय. व्हिडिओमधून आत्महत्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी त्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी संघपालच्या आत्महत्याला जबाबदार असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल केलीय. तसेच 2 जणांना अटक केली आहे. दरम्यान, संघपाल हा विडिओमध्ये त्याच्यावर झालेल्या छळाबद्दल सांगताना संघपाल ऐकू आलेला आहे.

दरम्यान, बाळापूर तालुक्यातील पारस येथे संघपाल सिद्धार्थ खंडारे या 30 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना काल सकाळच्या सुमारास समोर आली. आत्महत्यापूर्वी संबंधित त्याने आपले दु:ख आणि अत्याचारांची माहिती देणारा भावनिक व्हिडीओ आपल्या भावाला पाठवला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रकरणामुळे पारस गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ तुटलेला मोबाईल आणि एक चावी सापडली. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून, तो संघपाल खंडारे याचाच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ देखील याच तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आत्महत्येमागील पार्श्वभूमी गंभीर असून, रेल्वे पोलिसात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

भावाला पाठवलेल्या व्हिडीओमध्ये गंभीर आरोप

मृतक संघपाल खंडारे याने भावाला एक व्हिडीओ पाठवून मनस्थिती स्पष्ट केली होती. "दादा, मी काय म्हणतो ते कान देवून नीट ऐक. माझं बायकोसोबत भांडण झालं. तिचा भाऊ, चुलत भाऊ आणि इतर चार-पाच जणांनी मला बेदम मारलं. काही दिवसांपूर्वी मला 3 लाखांचे कर्ज काढायला लावलं आणि आता जगू देत नाहीयेत. हा व्हिडीओ पोलिसांना दाखव आणि त्यांच्यावर केस कर," अशी भावनिक साद त्याने भावाला घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT