Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

akola crime news : अकोल्यात खळबळजनक घटना घडली. दिवसभर बेपत्ता असलेल्या ५ वर्षांच्या चिमुकल्याचा सांडपाण्यात मृतदेह आढळला आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या एका गावात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत अभिजीत तायडे (वय 5) असं या मृतक चिमुकल्याचं नाव आहे. हा चिमुकला पाण्याच्या डबक्यात पडून दगावला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. अनिकेत तायडे हा सकाळपासून बेपत्ता होता. 'तो' बेपत्ता असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मुलाचा शोध घेण्याचं आवाहन या वायरल मेसेजमधून करण्यात येत होतं. मात्र, सायंकाळी 4 वाजता त्यांच्याच घराजवळील सांडपाण्यात अनिकेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय होतं प्रकरण?

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावं. याच गावातील अभिजीत तायडे कुटुंब वास्तव्यास आहे. अभिजीत तायडे यांना तीन मुले आहेत. त्यांचा मधला मुलगा अनिकेत तायडे हा सकाळी साधारणता नऊ वाजताच्या जवळपास अंगणवाडीत जाण्यासाठी निघाला होता. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्याची अंगणवाडी मधून सुट्टी होते. बराच वेळ झाला अनिकेत घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला.

पुढं मनब्दा गावातील गावकऱ्यांच्या घरोघरी जात प्रत्येकांना मुलाबद्दल विचारणा केली. परंतु त्याचा सुगावा हाती लागला नाही. अखेर गावातील तरुणांनी अनिकेत बेपत्ता असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. सर्वीकडे अनिकेच्या शोधार्थ शोध मोहीम सुरू झाली. बराच वेळ झाला तरी अनिकेचा सुगावा लागत नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. त्यानंतरही गावकऱ्यांकडून अनिकेतचा शोध सुरु होता. मात्र, सायंकाळी चार वाजता सुमारास अनिकेत बाबत धक्कादायक माहिती समोर आली आणि गावात एकच खळबळ उडाली.

घराशेजारीच सांडपाण्यात सापडला मृतदेह

अनिकेतच्याच घराशेजारी असलेल्या सांडपाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. तायडे कुटुंब घटनास्थळी दाखल झाला, अनिकेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृत अनिकेतच्या आजीने त्याचा मृतदेह मांडीवर घेत, घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे अनिकेचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे. कारण, तायडे कुटुंबीयांच्या घरासमोर सिमेंटचा काँक्रिटीकरण रस्ता बांधण्यात आलाय.

या रस्त्यामुळे त्याच्या घरात बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलं होतं. याच सांडपाण्यात बुडून अनिकेतचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची अवस्था पाहता घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे, हा मुलगा सकाळपासूनच बेपत्ता होता. परंतु त्याच्या मृत्यूचं मूळ कारण आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येणारेये. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

Raj Thackeray: कानाला मराठी समजणार नसेल तर कानाखाली पडणारच; राज ठाकरेंचा सणसणीत इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT