Akola News  Saam Tv
महाराष्ट्र

Railway News : बाकी डबेसोडून रेल्वेचं इंजिन पळालं पुढे; रेल्वेचं कपलिंग अचानक तुटलं

Akola News : अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू स्थानकाजवळ मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन तुकडे झाले. रेल्वे पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

Alisha Khedekar

  • अकोल्याजवळ मालगाडीचे कपलिंग अचानक तुटले

  • गाडीचे दोन भाग होऊन रेल्वे वाहतुकीवर परिणाम

  • रेल्वे पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

  • जीवितहानी नाही, परंतु चौकशी सुरू

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने रेल्वे प्रशासन व प्रवाशांना काही काळ काळजीत टाकले. नागपूरकडून मुंबईकडे निघालेल्या मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन भाग झाले. इंजिनसह काही डबे पुढे निघून गेले तर गार्ड असलेले काही डबे मागे थांबले. काही क्षणांसाठी रेल्वेमार्गावर भीतीचे सावट पसरले असले तरी प्रसंगावधान राखत रेल्वे पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अपघात टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर पोल क्रमांक ५९९/१२ जवळ घडली. धावत्या गाडीचे कपलिंग अचानक तुटल्यामुळे गाडीचे दोन तुकडे झाले. घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. या गोंधळामुळे नागपूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र, तातडीने गाड्यांचा वेग नियंत्रित करून आणि सुटलेले डबे सुरक्षित ठिकाणी स्थिर करून परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक साहित्य आणि कच्चा माल भरलेला असल्याचे कळते. जर गाडी अधिक वेगाने धावत असताना ही घटना घडली असती, तर गंभीर अपघात होऊन मोठे नुकसान झाले असते. मात्र, रेल्वे पायलटच्या सतर्कतेमुळे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने कपलिंग तुटण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. मालगाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीतील त्रुटीमुळे की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रसंग घडला याचा तपास सुरु आहे. या भागातून दररोज नागपूर, भुसावळ, मुंबईकडे अनेक गाड्या धावत असतात. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

या घटनेमुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी नागरिक दिलासा व्यक्त करत आहेत की वेळेवर लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे प्रशासनाने काही वेळात वाहतूक सुरळीत सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : दबक्या पावलाने आला अन् झडप घातली, अंगणात खेळणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेटचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT