अकोटमध्ये एमआयएमच्या पाचही नगरसेवकांवर कारवाईची शक्यता
पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली
भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन दिल्याने वाद
अकोल्यात भाजप-एमआयएम अप्रत्यक्ष युतीची राजकीय चर्चा
अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एमआयएमच्या पाचही नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एमआयएम पक्षाकडून पाचही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आपल्यावर कारवाई का करू नये?, यासाठी पक्षाकडून खुलासा मागितला आहे. पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन करून भारतीय जनता पार्टी समर्थित गटास सहकार्य आणि स्वीकृत नगरसेवकाला समर्थन दिल्याबाबत एमआयएमने आपल्या नगरसेवकांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अकोल्यातील अकोटमध्ये भाजपमध्ये एमआयएमसोबत युती केल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. या युतीनंतर भाजपने संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली होती. अशाप्रकारे युती करणे भाजपला कदापि मान्य नसल्याचे सांगण्यात आले आणि युती तुटली होती. पण आता अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक समोर आला. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपच्या नेत्याच्या मुलाची अखेर निवड झाली. माजी नगराध्यक्षांचे पुत्र जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी समर्थन दिलं. एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजप नेते तथा अकोटचे माजी नराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांच्या मुलाला नगरसेवक पदासाठी समर्थन दिल्यामुळे अकोल्यात भाजप-एमआयएमच्या अप्रत्यक्ष युतीची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, जितेन बरेठीया याचा भाजपशी संबंध नाही. भाजपला बदनाम करण्याचा कट रचल्या जात आहे, असा आरोप आमदार भारसाकळे यांनी केला होता. जितेन बरेठिया यांचे वडील रामचंद्र बरेठिया अजूनही भाजपचे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे पुरावे देखील समोर आले आहेत. आमदार भारसाकळे यांच्याशी जवळीक संबंध असल्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत. एमआयएमकडून स्विकृत नगरसेवकपदी भाजपच्या नेत्याच्या मुलाची निवड झाल्याने विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.
एमआयएमच्या ५ नगरसेवकांची नावं -
१) रेश्मा परवीन मोहम्मद अजीम
२) युसुफ खान हादीक खान
३) दिलशाद बी रज्जाक खा
४) अफरीन अंजुम मो. शरफोद्दिन
५) हन्नान शाह सुलतान शाह
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.