Akola Police Training Centre News Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधा, 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर चौकशी सुरू

Akola Police Training Centre News: अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्हटकर अकोल्यात दाखल झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय गवळी, अकोला

Akola Police Training Centre News:

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्हटकर अकोल्यात दाखल झाले आहे. अकोल्यातल्या गडंंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले आहे. काल सर्वातआधी हे प्रकरण 'साम'नं समोर आणलं होतं. हा गंभीर प्रकार दाबण्याचा पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. आता या प्रकरणाची 'एसआयटी' चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

अकोल्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातल्या 70 हून महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली होती. आता पर्यत 23 पेक्षा मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे अचानक प्रकृती बिघडली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. जवळपास 70 ते 80 तरुणींवर प्रथमोपचार करण्यात आले होते. तर 30 पेक्षा जास्त महिला पोलीस रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अकोल्यात खाजगी रुग्णालयात या सर्वांवर उपचार उपचार सुरू असून काल अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर, वंचित नेत्यां अंजली आंबेडकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली होती. दूषित पाणी प्यायल्यामुळे अचानक प्रकृती बिघडण्याचा प्राथमिक कारण समोर आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दूषित पाणी प्यायल्यानं ट्रेनिंगवर असलेल्या या महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यात वाढत्या उन्हाच्या पारामूळ या सर्व आरोग्यावर परिणाम झाला असल्याचे समजते आहे. त्यामुळ गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या होत होत्या. काहींना प्रथमोपचार करून परत पाठवण्यात आले आहे. काही मुलींवर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उपचार सुरू आहे.  (Latest Marathi News)

दरम्यान, दूषित पाणी प्यायलामूळ जवळपास 200 पेक्षा जास्त महिला पोलिसांची प्रकृती अचानकपणे बिघडली आहे. असं माहिती समोर येतंय. तर काहींना उन्हाचा फटका बसलाय. दरम्यान काही महिला पोलीस या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्या वातावरणात बदल झाला असावा, त्यामुळेच त्यांच्या प्रकृती बिघडली असावी अंदाज लावल्या जात आहे. दरम्यान यातील एका तरुणीला डेंगू, तर 80 टक्के मुलींना कावीळ आजाराची लागण झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

मिटकरींकडून SIT चौकशी करण्याची मागणी

याप्रकरणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मिटकरी पत्रात म्हणाले आहेत की, अकोला पोलीस प्रशिक्षण विभागात पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींना दुषित अन्न व पाण्यामुळे उलटी, डेंगू, मलेरिया, कावीळ अशा आजारांना नाहक बळी पडावे लागणे. ही बाब जिल्ह्यासह राज्यासाठी चिंताजनक व तितकीच गंभीर असून संबंधित विभागाचे अधिकारी डोंगरे यांना याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला होता. यावर त्यांनी कुठलाच प्रतिसाद न देता, मुली ३ दिवसांपासून आजारी असतांना शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल न करणे, खाजगी रुग्णालयात मुली स्वतःहून दाखल होणे व रुग्णांचा आकडा जाणीवपूर्वक दाबणे, पत्रकारांनी बातमी चालवल्यानंतर आमदारांना का सांगितलं, अशी दमदाटी अधिकाऱ्यांकडून होणे, ही बाब अत्यंत गंभीर बाब आहे.

पत्रात त्यांनी पुढे लिहिलं आहे की म्हणाले आहे की, ''सदर प्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद सभापती डॉ. निलम गोन्हे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळविण्यात आली. तसेच याची सखोल चौकशी करुन ताबडतोब SIT चौकशी लावावी. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये या संबंधित सरकारकडून SIT लावण्याची मागणी केली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT