AKOLA POLICE ARREST 1991 WIFE MURDER ACCUSED AFTER 35 YEARS OF HIDING Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : बायकोची हत्या करून नवरा फरार, ३५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Akola Crime News : अकोला पोलिसांची मोठी कारवाई! १९९१ मध्ये पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अकोला पोलिसांनी तब्बल ३५ वर्षांनंतर संभाजीनगरातून अटक केली.

Alisha Khedekar

  • अकोल्यात पोलिसांची मोठी कारवाई

  • ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला बेड्या

  • स्वतःच्या पत्नीची हत्या करून झाला होता फरार

  • अकोला पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

अक्षय गवळी, अकोला

'कानून के हात बहुत लंबे होते है', असा डायलॉग तुम्ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ऐकला असेल, नेमका त्याचाच प्रत्यय अकोल्यात आला आहे. अकोला पोलिसांनी तब्बल ३५ वर्षांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या कारवाईची जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे. एकनाथ गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सध्या त्याचे वय ७३ वर्षे असून १९९१ मध्ये घडलेल्या पत्नीच्या हत्या प्रकरणात तो मुख्य आरोपी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च १९९१ रोजी अकोला शहरातील गौतमनगर परिसरातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली होती. कौटुंबिक वादातून एकनाथ गायकवाडने त्याची पत्नी चित्रलेखा गायकवाडवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्या वेळी आरोपीचे वय सुमारे ३८ वर्षे होते. घटना घडल्यानंतर एकनाथ गायकवाड फरार झाला होता. त्यानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. न्यायालयानेही त्याच्याविरुद्ध कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, अनेक वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अलीकडेच आरोपी संभाजीनगर जिल्ह्यातील सिडको परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर खदान पोलीस ठाण्याच्या वॉरंट पथकाने सापळा रचला. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करत एकनाथ गायकवाड याला ताब्यात घेतले.

तब्बल ३५ वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर आरोपीला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जुन्या प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासातही पोलिसांची तत्परता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, आरोपी एवढी वर्षे नेमका कुठे राहत होता, त्याने आपली ओळख कशी लपवली आणि कोणाच्या मदतीने तो पोलिसांपासून दूर राहिला, याचा तपास आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपवर्गीकरणाच्या समर्थनात लातूरमध्ये महामोर्चा; मोठ्या संख्येने बांधवांचा सहभाग

Kalyan Crime: कल्याण हादरले! पोलिसावर जीवघेणा हल्ला, आधी काठीने मारहाण नंतर...; VIDEO व्हायरल

5 मिनिटांत बटाटे उकडण्याची सोपी पद्धत

राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची तयारी, भाजप संसदेत प्रस्ताव आणणार; खासदाराने सगळा प्लान सांगितला

Arshdeep Singh: दिल नैयो लगदा! अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौर आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT