Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: प्रेमाची कुणकुण..प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या केल्‍याचा रचला कट

प्रेमाची कुणकुण..प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; आत्महत्या केल्‍याचा रचला कट

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीच्‍या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या (Crime News) करत मृतदेह विहिरीत फेकून दिल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. (Maharashtra News)

पातूर (Patur) तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे हे काम करीत असून तिथेच रखवालदार म्हणून राहत होते. (Akola) त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील राहायची. दरम्यान, मागील काही दिवस बंडू हे बेपत्ता झाले. याबाबत त्यांची पत्नी मीरा डाखोरे यांनी पातूर पोलिस (Police) ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सावरगाव इथे शुक्रवारी (९ डिसेंबर) बंडू या व्यक्तीचा कार्ला शेत शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. दरम्यान, वैद्यकीय अहवालात त्या व्यक्तीची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला. तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी बंडू यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

गजानन बावणे आणि मृतक बंडू यांची मैत्री असून चांगले संबंध होते. गजाननचे बंडूच्या घरी नेहमी ये-जा राहायचे. त्यातून मृतक बंडू डाखोरे त्यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे (वय ३५) हिचे आणि गजानन प्रेम सबंध जुळले. या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला लागली. त्यातून दोघे पती- पत्नीचे सतत वाद व्हायचे. अखेर पत्नीने पतीचा काटा काढण्याचा निश्चित केले. गजानन आणि बंडू हे दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले. त्यानंतर गजाननने दुपट्ट्याच्या साह्याने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी; असे दर्शवून आत्महत्येचा बनाव रचला. त्यानंतर ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती. त्याच शेजारील शेतातील विहिरीत बंडू यांचा मृतदेह फेकून दिला.

पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, हत्येनंतर मृतक बंडूच्या पत्नीने म्हणजेच पातुर पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शेजारील विहिरीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हे सर्व आत्महत्या बनाव रचून हत्येचा केल्याचे प्रकरण उघडे झाले. सध्या मारेकरी पत्नी आणि तिचा प्रियकर गजानन बावणे हे पातूर पोलीसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : १ कोटी ४० लाखांची थकबाकी! जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदारानं आयुष्य संपवलं, पैसे न मिळाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

Plane Crash: आणखी एक Plane Crash; महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळलं विमान

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांचा शनिवारी राजीनामा? अजित पवार काय निर्णय घेणार पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याण तरुणी मारहाण प्रकरण; मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली पोलिसांची भेट

Ind vs Eng : क्रिकेटच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते मँचेस्टर कसोटीत घडलं; गंभीर-गिलच्या निर्णयानं सगळेच हैराण, नेमकं झालं तरी काय?

SCROLL FOR NEXT