बीडच्या शिरसाळा येथे मामानेच अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. सदरील मुलगी रात्री घराबाहेर पडली असता मामाने तिला सोबत घेऊन जात अत्याचार केले हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने शिरसाळा पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणात गुन्हा दाखल केला.. अधिक तपास पोलीस करत आहेत..
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हे विक्रेते बाहेरील लोक आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. देशातील कुठल्यातरी राज्याच्या नावावर बेकायदेशीररीत्या भारतात आलेले आणि पुणे शहरात फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळे सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यांना विरोध केला जायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.मागील सात ते आठ वर्षापासून हा रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील पूल मोडकळीस आले आहेत. मोडकळीस आलेल्या या पुलावरून जड वाहनास प्रवेश बंदी घालण्यात आली. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना तामसा येथे शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर या रस्त्यावर जवळपास 20 ते 25 गावे आहेत. या गावातील नागरिकांचा प्रवास या रस्त्यामुळे अत्यंत खडतर बनला आहे. लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. परंतु लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावाकऱ्यांनी केला आहे. तामसा ते कांडली रेल्वे स्टेशन हा रस्ता आणि रस्त्यावरील मोडकळीस आलेल्या पुलाचे तात्काळ बांधकाम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या गावकऱ्यांनी दिला आहे.
चांदीचा भाव पुन्हा १,१९,५०० रुपयांवर
जळगाव चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १९५०० रुपयांवर पोहोचली.GST
सोन्याच्या भावात १००० रुपयांची वाढ होऊन ते GST १ लाख ३५०० रुपयांवर पोहोचले.
कांदिवलीत रिक्षा चालक व स्कूल बस कर्मचाऱ्यात मारामारी; वाहतूक ठप्प, मुले बसमध्ये अडकली
कांदिवलीतील लोखंडवाला रिक्षा स्टँडजवळ बुधवारी सकाळी स्कूल बसच्या कर्मचाऱ्यां आणि रिक्षा चालकामध्ये जोरदार मारामारी झाली. या घटनेमुळे जवळपास अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली.
मारामारीमुळे स्कूल बसमधील लहान मुले बसमध्येच अडकून पडली होती. पालक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क केला. मात्र पोलिस पोहोचेपर्यंत मुले तब्बल ३० मिनिटे बसमध्ये वाट पाहत होती.
जळगाव चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १९५०० रुपयांवर पोहोचली.GST
सोन्याच्या भावात १००० रुपयांची वाढ होऊन ते GST १ लाख ३५०० रुपयांवर पोहोचले.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज येथे पावसाळ्यात बोगद्यात पाणी साचून राहत असल्यामुळे काही दिवसापूर्वी बोगद्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले त्यामध्ये तब्बल 15 दिवस सदर बोगदा आवागमणासाठी बंद करण्यात आलेला होता
डोंबिवली एम आय दि सि मधील एर सील या केमिकल कंपनीला आग कल्याण डोंबिवली अग्नीशमन दल अधिकारी घटनास्थळी दाखल.
छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना मारहाण केली होती. यामुळे सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना २४ तासांच्या आत जामिन मंजूर झाला आहे.
गौण खनिज माफीयांनी तलाठ्यांनाच भर रस्त्यात केली धक्काबुक्की
गौण खनिज प्रतिबंधक पथकातील इतर कर्मचाऱ्यांना देखील करण्यात आली धक्काबुक्की
पथकाने गौण खनिज वाहतूक करतानाचा पकडलेला ट्रॅक्टर माफीयांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळविला
पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी या नावाची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली
वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे शहरातील सखल भाग सोसायटी मधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, याच साचलेल्या पाण्यातून शाळकरी मुलांसह नागरिकांना देखील ये- जा करावी लागत आहे.
मुंबईची पवई भांडुप मुलुंड विक्रोळी विभागात रिमझिम पाऊस
कालपासून परत असलेल्या पावसाने आज सकाळपासून घेतली विश्रांती
आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे..
आज अमावस्येचे उधाण
किनारपट्टी भागामध्ये साडेचार मीटर उंचीच्या लाटा
दोन दिवस किनारपट्टी भागामध्ये लाटांचा तडाका
किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मांडवी किनारी लगतच्या भागात अजस्त्र लाटा
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, दरम्यान या हल्ल्यात विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले आहेत, सुरज चव्हाण यांच्यासह 11जणांवर लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाणे गुन्हे दाखल आहेत. सुरज चव्हाण यांच्यासह 10 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
- नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली होती सुनावणी
- खेडकर कुटुंबाने वकिलांमार्फत मांडली होती बाजू
- विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कार्यालयाने केलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र रद्द
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र रद्द केल्यानं मागासवर्गीय प्रवर्गात लाभ घेता येणार नाही
- कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि उत्पन्नाचे स्रोत तपासून देण्यात आला निर्णय
- या निर्णयाने खेडकर कुटुंबाला मोठा दणका
सखल भागात साचले पाणी
अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे पाण्याखाली
अंधेरी पोलीस आणि सहार वाहतूक पोलीस यांनी सववे वाहतुकीसाठी केला बंद
वाहन चालकांनी पर्यायी मार्ग म्हणून गोखले ब्रिज आणि प्रबोधनकार ठाकरे पुलाचा अवलंब करावा वाहतूक पोलिसांचे आवाहन
महापालिका कर्मचाऱ्यांकडून पंपाद्वारे सबवेतील पाणी उपसण्याचे काम सुरू
- या ठिकाणी ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्देवी आहे मध्यरात्री कोणीतरी हॉस्टेलमध्ये घुसून अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल आणि रात्री तक्रार न देता दुसऱ्या दिवशी तक्रार दिली जाते ही गंभीर बाब आहे...
- मुलींना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी खरंतर होस्टेल असले पाहिजे आजूबाजूला बियर बार आणि देशी दारूच्या शॉप्स आहेत त्यामुळे अशा ठिकाणी होस्टेल ठेवू नये..
- या सगळ्या प्रकरणासंदर्भात कुठेतरी वॉर्डन ही जबाबदार आहे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनीष बोरकर यांनी केली आहे..
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय हस्तक्षेपाच्या शक्यतेने वादंग उठले आहे. संबंधित प्रकरणातील तपासावर दबाव आणला गेला असल्याचा संशय व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी शिंदेसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी आटपाडी पोलिसांना निवेदन देत केली आहे.
पेरणीनंतर गायब झालेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावलीय. काल दिवसभर आज सकाळी मराठवाड्यात पावसाने पुनरागमन केले आहे. विभागातील 30 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 43.8 मिलिमीटर तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वात कमी 9.1 मिलिमीटर पाऊस झाला. अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये जालन्यातील 6 बीड मधील 6 लातूर मधील 1 धाराशिव मधील 2 नांदेड मध्ये 2 परभणीत 9 हिंगोलीत 4 मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे वाळून चालल्या पिकांना मोठं जीवदान मिळाली आहे.
भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यात येणाऱ्या आसगाव - रनाळा-भावड रस्त्यावर पाच फुटाचे जीवघेणे खड्डे पडले आहेत. ४० वर्षांपूर्वी या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी योग्य पद्धतीने वाहून जावं याकरिता सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली होती. कालांतराने ती पाईप फुटली. मात्र ती दुरुस्ती न करता अधिकाऱ्यांनी त्यात गिट्टी आणि मुरूम टाकून ती बुजवली. वेळोवेळी या रस्त्याचं डांबरीकरणाचं बांधकाम करण्यात आलं रस्ता उंच होत गेला. वाहतूक वाढल्याने कालांतराने डांबरीकरणाची गिट्टी उघडत गेल्यान खड्डा पडला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अतिवृष्टी झाली आणि त्यात पुन्हा या रस्त्यातील गिट्टी वाहून गेल्याने रस्ता आता खोल खड्डा पडलाय. ४० वर्षांपूर्वी बांधकाम केलेली पाईपलाईन फुटल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी त्याची दुरुस्ती केली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. ५ फुटाचा खड्डा पडल्याने वाहनधारकांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे.
जळगावच्या चाळीसगावात कपाशी गोडाऊनला भीषण आग लागली आहे...*
या गोडाऊन मध्ये कपाशीच्या बांधलेल्या गाठी ठेवण्यात आलेल्या होत्या
गेल्या चार तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या एमआयडीसी परिसरात ही आग लागली आहे...
शेजारील तालुक्यातील अग्निशमन दल तसेच स्थानिक अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे
सांगली जिल्ह्यात खुनाच्या घटनांना उधाण आले असून, कुपवाडमधील रामकृष्ण नगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल सुरेश रायते (वय 34) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात हत्याराने वार करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तर खून करून मारेकरी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
* हनी ट्रॅप मधील मान्यवरांचे नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक' अशा आशयाचे लावण्यात आले होते फलक
* अज्ञातांनी लावलेले फलक पोलिसांनी काढले
* नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू..
* संशयित हॉटेल चालक आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची देखील सुरू आहे गुप्त चौकशी
* मात्र प्रकरणाची शहरात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू
* हनी ट्रॅप प्रकरणात नावं उघड होणार का याबाबत मात्र चर्चांना उधाण...
कल्याण मधील तरुणीला मारहाण प्रकरण
मुख्य आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा दोघांनाही मानपाडा पोलीस आज न्यायालयात करणार हजर
11 ते 12 च्या सुमारास कल्याण न्यायालयात करणार हजर
आरोपी मुख्य आरोपी गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलीस त्याची जास्तीत जास्त चौकशीसाठी पाच दिवसाची पोलीस कोठडीची करणार मागणी
तर सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या इतर आरोपीच्या नातेवाईकाची चौकशी करून त्यांना देखील अटक करण्याची शक्यता
लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम कार्ड बदलून आर्थिक फसवणूक करणाऱ्या हरियाणातील आरोपीला नागपूर येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 26 हजार रोख रक्कम व विविध बँकांचे एकूण 61 एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या आरोपीवर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अन्य ठिकाणी देखील असेच गुन्हे दाखल असून एकूण 4 गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला.सुमारास नरेश नामदेव भाजीपाले (रा. समर्थ नगर, लाखनी) हे स्टेट बँक ऑफ इंडिया, लाखनीच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांची नजर चुकवून बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक बैजलाल देवराम येळेकर यांचे एटीएम कार्ड बदलले. या कार्डाचा वापर करून त्यांनी 25,700 रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर वन तपासणी नाका उमरझरी व माथणी टोल नाक्यावरून वाहनांची तपासणी केली असता संबंधित वाहनाचा फास्ट टॅग के तपासून आरोपींचा मोबाइल क्रमांक प्राप्त व करण्यात आला.
आज संत नामदेव महाराजांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी बारा वाजता पंढरपुरात येणार आहेत. मुख्यमंत्री पंढरपूरला येणार असल्याने आज संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशीच भाविकांना मात्र संत नामदेव पायरीच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी संत नामदेव मंदिर परिसरात बॅरॅकेटिंग केले आहे
कल्याण मधील नांदिवली परिसरात एका दवाखान्यात काम करणाऱ्या मुलीला मारहाण केल्याच्या प्रकरणी गिरीश झा या आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे, हा आरोपी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेवाळी भागातून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला
आजही सकाळपासून सुरू आहे पावसाची बरसात
जिल्ह्यासाठी आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट
गेले चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ
सर्वच नद्या वाहताहेत दुधड्या भरून
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सरासरी पाऊस कमीच
पावसाळ्यात सरासरी साडेतीन मिलीमीटर पाऊस पडतो
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंतचा पाऊस कमी
गेल्यावर्षी जून महिन्यात ८१७ मिलिमीटर तर जुलै महिन्यात आतापर्यंत १२८६.४० पाऊस पडतो
गेल्या वर्षी या कालावधीत सरासरी 2110 मिलिमीटर पावसाची नोंद
यावर्षी जून मध्ये 746 तर जुलैमध्ये आतापर्यंत 639 पाऊस आला दोन महिन्यात केवळ 41.37% पाऊस पडला
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून शेतकऱ्यांना शब्द
प्रत्येक गावात जाऊन शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा सुरू
धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी महामार्गसाठी संमती पत्र दिल्याचीही माहिती
चेन्नई सुरत महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांचं खुंटेवाडी येथे येणार इंटरसेक्शनही शंभर एकरातच बसवण्यासाठी मुंबईत प्राथमिक बैठक झाल्याची माहिती
इंटरसेक्शनसाठी लागणार होती साडेचारशे एकर जमीन, मात्र शंभर एकरापर्यंत काम करण्याच्या सूचना
अधिकारी येऊन खुंटेवाडी येथे संवाद साधणार असल्याची माहिती
७२ वर्षाच्या लीला खेमचंद राठोड नावाच्या महिला झाल्या बेपत्ता
पुण्याच्या शांतीनगर सोसायटी समोर असलेल्या एका मेडिकल समोरून अचानक या वयोवृद्ध महिला झाल्या बेपत्ता
पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
वयोवृद्ध आजी बेपत्ता झाल्यानंतर शहरातील अनेक सीसीटीव्हीमध्ये कैद
कोंढवा पोलिसांकडून या बेपत्ता आजींचा तपास सुरू
गेल्या तीन दिवसांपूर्वी मुलासोबत खरेदीसाठी आलेल्या आजी अचानक झाल्या बेपत्ता
जळगाव चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १५ हजार रुपयांवर पोहोचली.GST सह १८हजार सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ होऊन ते GST १ लाख ३००० रुपयांवर पोहोचले. १९ जुलै रोजी एक लाख १३ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात २० रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १८ हजार पोहोचली. २१ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर चांदी सोन्यामध्ये वाढ झाली.
झारखंड येथील प्रसिद्ध देवस्थान चे नावे समाज माध्यमात बनावट जाहिरात करून सायबर चोरट्याने पुण्यातील एका भाविकांकडून सव्वा पाच लाख रुपये उकळले
देवीची पूजा करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्याने भाविकाला मोबाईल मध्ये फाईल डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे त्याच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले
भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे 24 जुलै पासून ३ दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दिल्ली येथून त्यांचे आगमन अमरावती येथे विमानतळावर होणार आहे. 25 तारखेला 10 वाजता अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथील महाविद्यालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दर्यापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे . दर्यापूर न्यायालय प्रशासनाच्या वतीने संपूर्ण इमारतीची विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश भूषण गवई हे न्यायाधीश झाल्यानंतर त्यांचे प्रथम आगमन दर्यापूर येथे होणार असल्याने दर्यापूर वाशीयांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. तर पोलीस प्रशासन सुद्धा आता अलर्ट झाले आहे.
ट्रकचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सला बसली जोरदार धडक...
या अपघातात ३ ते ४ जन गंभीर जखमी....तर १५ ते २० जन किरकोळ जखमी..
नागपूर -संभाजीनगर महामार्गावर
घडला अपघात.
सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडला अपघात.
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी १०८ रुग्ण वाहिकेने अकोला येथे हलवले. तर किरकोळ जखमींवर शेलुबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू...
पुण्यातील मावळ तालुक्यात झालेल्या कुंड मळा दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळत आहे. कुंड मळ्याचा उड्डाणपूल पडून झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारकडून पुणे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या जवळपास 627 उड्डाणपूलांच स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून यापैकी जवळपास 63 धोकादायक उड्डाणपूल पूर्णपणे पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला आहे.तर पावसाळ्यानंतर हे सर्व फुल पाडण्यात येणार असून 80 पेक्षा अधिक पुलाची डागडूजी देखील करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल आहे.
धाराशिव - सेरिंटिक व रिन्यू पावर पवनचक्की कंपनीने शेतकऱ्याला दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा एकदा वाशी तालुक्यातील तांदळवाडी,पारा,सारोळा सह परीसरातील शेतकरी आक्रमक झाले असुन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची भेट घेऊन २६ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय पवनचक्की कंपनीकडुन शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला गेला असुन त्यामुळे अधिकचा मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय.
जालना देऊळगाव राजा रोडवर चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल. त्यांच्या ताब्यातून जवळपास 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अभय डोंगरे आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी जेरबंद केल आहे.जालना- देऊळगावराजा मार्गावरील आनंदगड येथे दोन दिवसांपूर्वी एकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना समोर आली होती.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालना शहरातील कन्हैया नगर परिसरात राहणाऱ्या अभय डोंगरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे
शंभर शेतकरी जमीन देण्यास तयार विमानतळासाठी सात गावातील शेतकऱ्यांकडून संमती संमती पत्र प्राप्त
भूसंपादन कायदा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ पुनर्वसन कायदा 2019 नुसार चौपट मोबदला मिळणार
शेतकऱ्याच्या एकूण संपादित जमिनीच्या दहा टक्के विकसित जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रशासनाकडून विमानतळ संपादन प्रक्रियेस गती
सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची आणि दहशतीची घटना घडली आहे. केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक, आणि नवनाथ नगर या भागात तीन अज्ञात व्यक्तींनी वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. ही घटना 23 जुलै रोजी रात्री 11.45 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात २३.३०टीएमसी पाणीसाठा म्हणजे ७९.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध
गेल्या यावर्षी याचवेळी धरणात १५.९४ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ५४.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता
गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा ८ टीएमसी पाणीसाठा जास्त
खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.
यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला
खडकवासला धरणक्षेत्रातून ५ टीएमसी पेक्षा जास्त पाणी मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आले आहे.
खडकवासला १.०५ टीएमसी
पानशेत ८.६०टीएमसी
वरसगाव १०.८६ टीएमसी
टेमघर २.७९ टीएमसी
श्रावण महिन्यात होणारी गर्दी व विविध सुविधा यांचा विचार करून भीमाशंकर येथे प्रशासन व मंदिर समितीने आवश्यक सोयीसुविधा तत्काळ मिळतील, अशी व्यवस्था करावी,
अधिकृत संकेतस्थळ स्थापन करुन येणाऱ्या भाविकांना माहिती द्यावी
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एक रांग व्हीआयपी आणि दुसरी साधी दर्शन रांग अशी व्यवस्था करावी.अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली
अकोल्यातील अकोट महामार्गावरील चोहोट्टा बाजार परिसरात एका 77 वर्षीय वयोवृद्धाचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेहाशेजारी कीटकनाशक होते. पोलिसांनी ते जप्त केले आहे. चोहोट्टा बाजार सार्वजनिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयासमोर एका व्यक्तीने विष प्राशन करून आपले जीवन संपवले, अशा चर्चेने खळबळ उडाली. मृत व्यक्तीजवळ आधारकार्ड होते. त्या आधारकार्डवर जनार्दन राजाराम अवचार असे नाव आहे. घटनास्थळी विषारी औषधाची बाटली, पाण्याची बाटली आणि पिशवी आढळून आली आहे. दरम्यान, मृत व्यक्ती शेतकरी असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच दहिहंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाये.
मुंबई करांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटळी मुंबई ला पाणी पुरवठा करणारा तिसरा तानसा धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. गेल्या आठवड्यात मध्य वैतरणा व मोडकसागर धरण हे ओव्हर फ्लो झाले होते. याच्या पाठोपाठ या आठवड्यात तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने मुंबई करांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटळी असून
परभणीच्या हट्टा परिसरातील हायटेक निवासी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी टीसी मागायला आलेले पालक जगन्नाथ हेंडगे यांना फिसवरून मारहाण केली होती ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल १२ दिवस या संस्थाचालक दाम्पत्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आज सकाळी त्यांना अखेर पुण्यातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.वारंवार हे दांपत्य त्यांचे लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना यांना पकडण्यात अडचणी आल्या मात्र शेवटी ते ताब्यात आले त्यांना आज पूर्णा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३ दिवस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथे गेल्या अडीच वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने दोन एकर जमीन भूसंपादित केली मात्र अद्याप पर्यंत एकही रुपये मायवेजा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वारंवार रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा शेतकऱ्यांची कसली दखलना घेतल्याने शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्काळ दखल घेत आंदोलकांना समजावून सांगून आत्मदहनापासून प्रवृत्त केले यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांना ही जाब विचारला यावेळी पोलिसांकडून लेखी आश्वासन देण्यात आले व शेतकऱ्यांना आत्मदहनांदोलनापासून प्रावर्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.