Plane Crash: पुन्हा विमान दुर्घटना; महामार्गावरील वाहनांवर कोसळलं विमान

Italy Plane Crash Video: महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर एक विमान कोसळल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Italy Plane Crash Video
Small aircraft crashes on Italy highway and bursts into flamesSaam Tv
Published On

काही दिवसापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी विमान अपघाताच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एका विमानाचा अपघात झाला असून विमान चक्क महामार्गावर धावणाऱ्या वाहनांवर कोसळले आहे. विमान कोसळताच वाहनं आणि विमान आगीत भस्म झाले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Italy plane crash caught on camera as aircraft crashes on moving traffic)

हा विमान अपघात इटलीमध्ये घडलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महामार्गावर अनेक वाहने धावत असल्याचे दिसत आहे. अनेक मोठी वाहनेही धावत आहेत. त्याचदरम्यान एक छोटे विमान कोसळले. रस्त्यावर विमान कोसळताच विमानाने पेट घेतला. वाहनांही आग लागली असून महामार्गावर मोठा आगीचा भडका उडला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com