Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : शिक्षकाचा शॉक लागून मृत्‍यू; शेतात भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना

Akola News : अवकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यासह गारपिटमूळ शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठे नुकसान झाले. तर उरलेल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: शेतात भुईमूंग पिकाची लागवड करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. (Akola) अशातच शेतातल्या भुईमुग पिकाला पाणी देण्यासाठी मोटार सुरु करायला गेलेल्या शिक्षकाला विजेचा जोराचा शॉक (Electric Shock) लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात हि घटना घडली असून प्रल्हाद पुंडलिक ठाकरे असं मृत शिक्षकाचे नाव आहे. 

अवकाळी पाऊस आणि जोराच्या वाऱ्यासह गारपिटमूळ (Farmer) शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठे नुकसान झाले. तर उरलेल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यात अकोल्यात तापमानाचा पारा वाढतच आहे. बऱ्याच शेतातील पीकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. विशेष म्हणजे आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये; म्हणून शेतकरी हा रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातो. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या. अकोल्यातल्या आजचा हा प्रकार असाच काहीसा म्हणता येईल.

आज सकाळी पातुर (Patur) तालुक्यातील चोंढी शेतशिवारात ही घटना घडली आहे. दरम्यान मयत प्रल्हाद ठाकरे हे मूळ जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असून ते काही दिवसांपासून सुट्टीवर होते. ठाकरे यांची आई ही महिला शेतकरी असून त्यांनी पातुर तालुक्यातील चोंढी शेतशिवारात असलेल्या एका एकरात भुईमूग पिकाची लागवड केली आहे. दर दोन दिवसांआड़ भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. परंतु प्रल्हाद ठाकरे हे घरी असल्याने आई शेतात न पाठवता स्वतः शेतात गेले होते. कॅनॉलद्वारे भुईमूग पिकाला पाणी देण्यासाठी प्रल्हाद हे विद्युत बोर्डाजवळ गेले. पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी विद्युत बोर्ड पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. यात त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. अशी प्राथमिक माहिती चान्नी पोलीस स्टेशन पीएसआय संजय कोहळे यांनी दिली. ठाकरे कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर मोठं संकट उभं झालं. प्रल्हाद यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असं कुटुंब आहे. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

Mahadevi Elephant : आणू महादेवीला घरी...! हत्तीणीला परत आणण्यासाठी दोन लाखांहून अधिक कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी

Maharashtra Live News Update : - यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT