Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात पडून एकाचा मृत्यू; महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

Akola News : अकोल्यातील अग्रेसन चौकातील खड्ड्यात बुडून संदलकर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोला शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे.  

अकोला शहरात मागील २४ तासात १४० मिमी पाऊस झाला. सोबतच वारा देखील होता. त्यामुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात घरांचे मोठं नुकसान झाले आहे. तर नाले साफसफाई अभावी रस्त्यावर नालीच पाणी येत असल्याने अकोलकर हैराण झाले आहेत. या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी आज अकोला महापालिका प्रशासनाची आमदार साजिद खान यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आणि नुकसानीचे पंचनामे करण्याचे सूचना दिल्या.

मृत्यूस महापालिका जबाबदार 

दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून रोहित धर्मराज संदलकर असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अकोल्यातील अग्रेसन चौकातील खड्ड्यात बुडून संदलकर या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले आहे. नालेसफाई नसल्याने पाणी रस्त्यावर येत असून महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील आमदार पठाण यांनी केला आहे. 

प्रशासनावर गुन्हा दाखलची मागणी 
दरम्यान, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रोहित संदलकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महापालिका प्रशासना विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करा; अशी मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी केली आहे. दरम्यान, आता शवविच्छेदन अहवालानंतरच रोहित संदलकर यांच्या मृत्यूचे मूळ कारण समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाने कहर; दादर स्थानक पाण्याखाली, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain : साखरझोपेत असताना घरावर दरड कोसळली, बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी|VIDEO

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकलला लेट मार्क, प्रवाशांचा खोळंबा, पाहा व्हिडिओ

IAS Success Story: CA झाली, नंतर UPSC परीक्षेत मिळवली दुसरी रँक; वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; IAS हर्षिता गोयल यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT