Kharip Hangam : शेतकऱ्याचे खरीप पेरणीचे बजेट वाढणार; बियाणे आणि मिश्र खतांमध्ये २५० रुपयांपर्यंत दरवाढ

Amravati News : पेरणी करण्यासाठी बँकेकडून कर्ज, हात उसनवारीने पैसे घेतो. बियाणे खरेदीपासून पिकांची उगवण झाल्यानंतर खत व फवारणी करत पिकांना वाढवतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणा मध्ये मोठे नुकसान होते
Kharip Hangam
Kharip HangamSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: निसर्गाच्या लहरीपणामध्ये आर्थिक गणित कोलमडलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या खरीप हंगामात महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. कारण ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६० ते २५० रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसणार आहे

शेतकरी उत्पादन घेण्यासाठी पैशाची तजबीज करत असतो. पेरणी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतो. तसेच हात उसनवारीने पैसे घेत हंगामाला सुरवात करत असतो. अगदी बियाणे खरेदीपासून पिकांची उगवण झाल्यानंतर त्यांना खत व फवारणी करत पिकांना वाढवत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणा मध्ये मोठे नुकसान होते. शिवाय आलेल्या मालाला अपेक्षित भाव देखील मिळत नसल्याने बहुतेक वेळेस केलेला खर्च देखील निघत नाही. यामुळे आर्थिक गणित कोलमडत असते. अशात आता बियाणे आणि खतांची भाववाढ झाली आहे. 

Kharip Hangam
Shahapur : सर्पदंशानंतर मुलगा विव्हळत राहिला; उपचार न मिळाल्याने अखेर मुलाचा मृत्यू; शहापूर उपजिल्हा रूग्णालयातील धक्कादायक प्रकार

मक्याचे बियाणे २०० रुपयांनी महागले 

खरीप हंगामात प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, बाजरी व मूग या पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले असून काही कंपन्यांचे मका बियाणे हे १०० ते २०० रुपयांनी महागले आहे. मकाचे ४ किलो बियाणे पाकीट ८०० ते २२५० रुपयांपर्यंत आहेत. तर कपाशीचे बियाणे पाकीट ४० रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. 

Kharip Hangam
Ambit Dam : मे महिन्यातच आंबित धरण ओव्हरफ्लो; आठ दिवसांपासून सुरु आहे अवकाळी पाऊस

खतांच्या दरातही वाढ 

तसेच गतवर्षीच्या तुलनेत डीएपी खत वगळता अन्य खतांच्या बॅगमध्ये १८० ते २८० रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये १२:३२:१६ या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. १०:२६:२६, १५:१५:१५ आणि २०:२०:०:१३ या खतांच्या किमती वाढल्या आहे. यामुळे खरिप पेरणीचे बजेट वाढणार आहे. याशिवाय रोगराई दूर करण्यासाठी लागणाऱ्या औषधीचे दर देखील वाढले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com