Akola News Saam TV
महाराष्ट्र

'या' गावात २ महिन्यांत ७ तरुणांनी संपवली जीवनयात्रा, नेमकं कारण काय?

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये २० ते २९ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: अकोला जिल्ह्यात (Akola District) कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकरी पुत्रांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची केल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही ३० ते ३५ वयोगटातील आहेत. तक अकोला जिल्ह्यातील उगवा या गावात मागील २ महिन्यामध्ये ७ युवकांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये २० ते २९ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता आशिष गोपीचंद अडचूले आणि सुभाष शेषराव भातुकले या दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.

पाहा व्हिडीओ -

या घटनेची माहिती मिळताच अकोट पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. गोपीचंद अडचूले आणि सुभाष शेषराव हे दोघेही ३० ते ३५ वयोगाटातील असून त्यांनी अनेक लोकांकडून कर्ज काढलं होतं.

कर्जाची परफेड कशी करायची या विवंचेनेतून या दोघांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने उगावा गावात चांगलीचं खळबळ उडाली आहे. दरम्यान, मागील २ महिन्यात उगवा गावात अनेकांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असून यामध्ये २० ते २९ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.

रोहित गजानन बहाकार (वय २० वर्ष) यानेही मागील दोन महिन्यात आत्महत्या केली आहे. रोहितच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. गोकुळ रोहणकार (२० ), पवन रामा वानखड़े (१९ ), शिरसाठ याच्यासह अन्य तरुणांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान, महाविद्यालयात प्रवेश न मिळणे, आई वडील रागावने, पैशांचे कर्ज या तरुणांच्या आत्महत्यांचं कारण आहे. दरम्यान या घटनेमुळे उगवा गाव हादरून गेला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon: महाराष्ट्र हादरला! ४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घरात नसताना नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Grow coriander at home: घरच्या कुंडीत नीट कोथिंबर उगवत नाहीये? या सोप्या टीप्सचा करा वापर

Lpg Gas cylinder Colour: सर्व गॅस सिलेंडर हे लाल रंगाचेच का असतात?

मोठी बातमी! निधी वाटपात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

Suryakumar-Devisha Love story : देविशाला डान्स करताना पाहिलं अन् सूर्याची विकेट पडली; विश्वविजेत्या कर्णधाराची हटके लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT