Maharashtra: 'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी'; मंत्री, अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन घेणार आढावा

Maharashtra Farmer News | राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे या नव्या मोहिमेची घोषणा आज, गुरुवारी सभागृहात करणार आहे.
Agriculture Minister Abdul Sattar
Agriculture Minister Abdul SattarSaam TV

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) वाढत्या आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकार नव्या मोहिमेची घोषणा करणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 'एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी' ही मोहीम रावबण्यात येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे या नव्या मोहिमेची घोषणा आज, गुरुवारी सभागृहात करणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. (Maharashtra Farmers News)

हे देखील पाहा -

या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याच्या कृषीमंत्र्यांपासून सचिव, कृषी अधिकारी आणि या विभागातील सर्व अधिकारी एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ९० दिवस हा मुक्काम असणार आहे. यावेळी दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात? बॅंकेचं कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत? शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा घेण्यात येणार आहे. हा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा आढाव घेतल्यानंतर त्याचा अभ्यास करुन त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार आहेत.

दरम्यान, राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काय नवीन मुद्दा नाही. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या पदभार स्विकारताच घोषणा केली होती. मात्र, ऐन पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचललं. या मुद्द्यावरुन विधानभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

Agriculture Minister Abdul Sattar
Pandharpur: विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या घरासह ऑफिसवर IT ची छापेमारी

याच पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना (Farmers) आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलू नका, सांगण्यासाठी पत्राद्वारे भावनिक साद देखील घातली होती. तरी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीयेत. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्देवी घटना महाराष्ट्रात घडतच आहेत. त्यामुळे नव्या सरकारकडून आणि नव्या कृषीमंत्र्याकडून केले जाणारे प्रयत्न किती यशस्वी होतील हे येणारा काळच सांगेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com