Manasvi Choudhary
उन्हाळ्यात योगा करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. योगा केल्याने शरीराचा व्यायाम होतो.
मात्र उन्हाळ्यात योगा करताना काही सामान्य चुका करू नये ज्यामुळे शारीरिक त्रास वाढू शकतो.
उन्हाळ्याच्या दिवसात योगा करताना रिकाम्या पोटी योगा करू नका यामुळे चक्कर किंवा थकवा येऊ शकतो.
कडक उन्हात योगा करणे टाळावे यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोकचा त्रास संभवू शकतो.
योगा करताना घाम जास्त येतो यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते यामुळे योगा करण्यापूर्वी पुरेसे पाणी प्यावे.
उन्हाळ्यात दुपारी योगा केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. सकाळी लवकर योगा केल्याने शरीरासाठी फायदा होतो. उन्हाळ्यात शरीर लवकर थकते यामुळे कठिण योगा प्रकार करणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.