Manasvi Choudhary
सणासुदीसाठी तसेच डेलीवेअरसाठी महिलांना सोन्याचे नवनवीन डिझाईन्सचे मंगसूत्र निवडणे हे फार महत्वाचे असते यासाठी आम्ही काही डिझाईन्स तुम्हाला सांगणार आहोत.
काळ्या मण्यांचे मंगळसूत्र हे साध्या सोन्याच्या चैनमध्ये गुंफलेले असते. लांब मंगळसूत्रामध्ये ही डिझाईन युनिक वाटते.
फुलांच्या लॉकेट्सचे मंगळसूत्र डिझाईन आकर्षक आहे. हे डिझाईन पारंपारिक लूकवर उठून दिसते. वजनाला ४ ते ५ ग्रॅम असते.
चौकोनी, त्रिकोनी आकाराचे मंगळसूत्र युनिक असतात हे मंगळसूत्र साधारणपणे ३५,००० ते ४५,००० पर्यंत असतात.
खड्यांनी बनवलेले हे मंगळसूत्र लांब आणि शॉर्ट डिझाईन्समध्ये असतात. हे मंगळसूत्र 5 ग्रॅम वजनाचे असतात.
सिंगल चैन आणि लहान पेडंट असलेले हे मंगळसूत्र ट्रेंडमध्ये आहे. या मंगळसूत्राचे डिझाईन सिंपल आणि सोबर असते. वजनाला हलके असल्याने हे मंगळसूत्र पॅटर्न महिला डेलीवेअरसाठी निवडतात.
मॅट फिनिश मंगळसूत्र हे पारंपारिक आणि राजेशाही लूक देतात. या मंगळसूत्रात मोठे पेडंट असते नाजूक कलाकुसर केलेली असल्याने आकर्षक दिसतात.