Akola Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Akola Heat Wave : अकोल्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम; १ जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता

Akola News : सध्या विदर्भामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून काल अकोल्यातील तापमान हे ४६ डिग्री सेल्सिअसवर गेले होते. तर अमरावतीचे तापमान ४४.५ अंशावर गेले होते

Rajesh Sonwane

अमर घटारे

अमरावती : राज्यात आठवडाभरापासून उष्णतेची लाट आली आहे. यात आता अकोला येथे पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अकोला वगळता पश्चिम विदर्भात तापमान काही अंशी कमी होणार असून १ जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ प्रा.अनिल बंड यांनि दिली आहे. 

सध्या विदर्भामध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून काल अकोल्यातील (Akola) तापमान हे ४६ डिग्री सेल्सिअसवर गेले होते. तर अमरावतीचे तापमान ४४.५ अंशावर गेले होते. या तापमानाचा नागरिकांना चांगला त्रास सहन करावा लागला. मात्र अकोला येथे पुढील ३ ते ४ दिवस अशाच (Heat Wave) प्रकारचे तापमान राहणार आहे. मात्र विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झाले असून वाऱ्याच्या दिशा बदललेल्या आहे, व वारे समुद्रावरून येत असल्याने अकोला वगळता पश्चिम विदर्भातील तापमानात घट होणार असल्याचा अंदाज अमरावती येथील हवामान तज्ञ अनिल बंड यांनी वर्तवला आहे. 

सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे चक्रीवादळ सक्रिय असून ते आज अति तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर, आयलँडला धडक देण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे विदर्भातील बाष्प तिकडे निघून गेली (Temperature) असल्याने सध्या विदर्भात पावासाची शक्यता कमी आहे. मात्र १ जूननंतर विदर्भात पावसाच्या आगमनाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ञ अनिल बंड यांनी वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

SCROLL FOR NEXT