सचिन कदम
रायगड : सुटी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेले असता रायगडच्या माणगाव तालुक्यातील भिरा कॉलनी परिसरात असलेल्या कुंडलिका नदी पात्रात पोहायला गेलेल्या दोन मित्रांपैकी एकाचा बुडून मुत्यु झाला आहे. संकेत परळकर (वय २१) मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा नांदेड येथील रहिवाशी आहे.
भिरा कॉलनी परीसरात संकेत परळकर हा आपल्या मित्रासोबत पुणे येथून मोटार सायकलने माणगाव येथे पर्यटनासाठी आला होता. माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहा बरोबर दोघेही (death) वाहून गेले. त्यातील एकाला आपला जीव वाचवण्यात यश आले. मात्र संकेत पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश शेलार मामा यांना हि घटना काळताच त्यांच्या टिमने शोधाशोध करत मोहिम राबविली. शोधकार्य करत वाहून गेलेल्या संकेतच मृतदेह शोधुन काढला. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करून माणगाव पोलिस (Police) या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.