Borgaon Manju Police Station Saam tv
महाराष्ट्र

Akola News : नव्या कायद्यानुसार अकोल्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिसांनी घेतले ताब्यात

Akola News : देशात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले असून जुन्या भारतीय दंड संहितामध्ये ५११ कलम होती

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : आजपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. नव्या कायद्यानूसार अकोल्यात पहिला गुन्हा दाखल झाला. अकोल्यातल्या बोरगांव मंजू पोलीस ठाण्यात नव्या कायद्यानूसार हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नव्या २६९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले असून जुन्या भारतीय दंड संहितामध्ये ५११ कलम होती. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत ३५८ कलम आहे. आता फसवणुकीसाठी कलम ४२० ऐवजी ३१६ कलम वापरले जाणार आहे. तर  खुनासाठी कलम ३०२ ऐवजी १०१ वापरले जाणार आहेत.

नितीन जानकीराम गवई (Akola) या बोरगाव मंजू गावातील रामजीनगर भागातल्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन गवईवर अनेक गुन्हे दाखल आहे. तो न्यायालयात सतत गैरहजर राहत असून फरार झाला होता. पोलीस काँस्टेबल आनंद चव्हाण यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. देशात आजपासून हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर अकोल्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नितीन गवईला नव्या कलमानुसार फरार असल्याच्या कलमाखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसठाण्याचे (Police) पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

SCROLL FOR NEXT