Bear Attack Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; अकोट तालुक्यातील घटना

Akola News : अकोट तालुक्यातील आदिवासी भागात अस्वलांचा वावर पाहण्यास मिळाला आहे. यात अस्वलांकडून होत असलेल्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यातील आदिवासी भागात बोरव्हा शिवारात अस्वलाने शेतकऱ्यावर हल्ला केला. यात (Farmer) शेतकरी गंभीर जखमी झाले असून शेतकऱ्यावर (Akola) अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

अकोट (Akot) तालुक्यातील आदिवासी भागात अस्वलांचा वावर पाहण्यास मिळाला आहे. यात अस्वलांकडून होत असलेल्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. या दरम्यान बोरव्हा शिवारातुन आज एक शेतकरी शेतीच्या कामासाठी जात असताना अस्वलाने अचानक हल्ला केला. अस्वलाने हल्ला केल्याने शेतकऱ्याने जोरात आरोड्या मारल्या. यामुळे परिसरातील काहीजण धावून आल्याने अस्वलाने तेथून पळ काढला. मात्र यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपाय योजना करण्याची मागणी 

अकोट तालुक्याच्या आदिवासी भागात अस्वलांचा वावर अधिक वाढला असून यावर वन विभागाने (Forest Department) लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी आदिवासी भागात राहणाऱ्या शेत शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT