Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : नाल्याला आला अचानक पाण्याचा लोंढा; शेतातून परतताना नाल्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Akola News : तेल्हारा तालुक्यासह पहाडपट्टीत काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे नदी- नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली परिसरात असलेल्या नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा वाहत आला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोला जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतातील नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा आला. यावेळी शेतातून घरी जाण्यासाठी निघालेला शेतकरी पाण्याच्या लोंढ्यातून निघताना वाहून गेला आहे. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अकोला जिल्ह्यातील दहिगाव अवताडे शेतशिवार परिसरात ही घटना घडली आहे. यात विनायक पुंडलिकराव अवताडे (वय ५८) यांचा मृत्यू झाला आहे. तेल्हारा तालुक्यासह पहाडपट्टीत काही ठिकाणी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे नदी- नाल्याच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. दरम्यान, दहिगाव अवताडे शेतशिवार परिसरात असलेल्या एका नाल्याला अचानक पाण्याचा मोठा लोंढा वाहत आला. 

दरम्यान शेतकरी विनायक अवताडे यांचे दहिगाव शेतशिवार शेत असून ते शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेत परिसरातल्या नाल्याला पाण्याचा मोठा लोंढा आला होता. साधारण काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नाल्यातून वाट काढत असताना अचानक आलेल्या याच्या नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अवताडे वाहून गेले होते.

रात्रभर कुटुंबियांकडून शोध
सकाळी नेहमीप्रमाणे शेतात स्वतः शेतात शेतीकामासाठी गेले होते. मात्र रात्री बराच वेळ झाला तरी विनायक अवताडे घरी आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्रभर गावात आणि शेतीच्या रस्त्यावर त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा काही सुगावा लागत नव्हता. दरम्यान आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अवताडे यांचा मृतदेह नाल्याच्या परिसरात आढळून आला. दहिगाव अवताडे या गावाच्या १ किमी अंतरावर मृतदेह दिसून आला आहे. त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjwala Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

Maharashtra Live News Update: इतिहासात प्रथमच सोलापूरमधील सीना नदीला महापूर, 26 गावात शिरले पाणी

Buldhana Tourism : बुलढाण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, हिवाळ्यात पर्यटकांची होते गर्दी

Dhananjay Munde: कुणी काम देतं का काम? धनंजय मुंडेंच्या मागणीनं राजकीय पडसाद, जरांगेंचाही खोचक टोला

SCROLL FOR NEXT