Andheri Police : ३५ पेक्षा जास्त घरफोडी; दोघेजण ताब्यात, ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Mumbai Andheri News : घरफोडी, चोरी प्रकरणातील गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मोबाईलचा वापर करून तो सर्रास घरफोड्या करत असे. सध्या तो अंधेरी, मालाड, कांदिवली, शिवाजी नगर आदी परिसरांमध्ये सक्रिय होता
Andheri Police
Andheri PoliceSaam tv
Published On

संजय गडदे

अंधेरी (मुंबई) : मुंबई शहर व परिसरात मागील काही दिवसांमध्ये घरफोडी व चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांच्या अंधेरी गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक मोठी कारवाई करत तब्बल ३५ पेक्षा जास्त घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास त्याच्या साथीदारास अटक केली आहे. तसेच चोरीच्या मालमत्तेची खरेदी करणाऱ्या इसमालाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत अंदाजे ४ लाख २० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अंधेरी परिसरात वास्तव्यास असलेल्या बाळा सुरेश आप्पासाहेब (वय ५२) यांचे घर बंद असताना चोरट्यांनी ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मोईन मुजम्मील शेख (वय ४५) व त्याचा साथीदार असिफ गुलाम नबी खान (वय ३८) यांना अटक केली. तर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह १०० ग्रॅम वजनाची सोन्याची व १०० ग्रॅम वजनाची चांदीची धातू, तसेच मोबाइल फोन आणि इतर मुद्देमाल जप्त केला.

Andheri Police
Sunil Bhusar : पालघरचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसार यांच्यावर मोठी जबाबदारी; शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

३५ घरफोडीचे गुन्हे दाखल 

चोरी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी मोईन शेख याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३५ पेक्षा जास्त घरफोडी, चोरी व फसवणूक प्रकरणांतील गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मोबाईलचा वापर करून तो सर्रास घरफोड्या करत असे. सध्या तो अंधेरी, मालाड, कांदिवली, शिवाजी नगर आदी परिसरांमध्ये सक्रिय होता.

Andheri Police
Beed Crime : शेतात दगड का टाकले?; जाब विचारल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण

चोरीचा माल खरेदी करणारा व्यापारीही अटकेत
दरम्यान चोरी केल्यानंतर मोईन शेख हा सदरचा माल विक्री करत होता. हा चोरीचा ऐवज शेख हबीबुर्रहमान शेख करीम (वय ५०) खरेदी करत होता. त्याला देखील पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्याच्या दुकानातून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी परिमंडळ १० चे पोलिस उपआयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर शशिकांत भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मच्छिंद्र, पोलीस निरीक्षक गुन्हे विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुपे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com