Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात पनोरी- जणोरी गावाचा संपर्क तुटलाल नदीच्या पुरात पर्यायी रस्ता गेला वाहून

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : सातपुडा पर्वत रांगेत पडत असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर आला आहे. नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील पनोरी व जणोरी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने पर्यायी तयार करण्यात आलेला रस्ता पुरात वाहून गेला आहे. 

अकोल्याच्या (Akola) अकोट तालुक्यातील पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाली. त्यामुळे नदीला पुर आला आहे. त्यात पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. म्हणून गावकऱ्यांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्या बांधण्यात आला आहे. पण सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या पावसामुळे पठार नदीला पूर (Flood) आला आणि पर्यायी रस्ता वाहून गेला. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे. 

मागील काही माहिन्यांपासून अकोट तालुक्यातील पठार नदीवरील नव्याने बांधकाम सुरू असलेले पुलाचे काम सुरू आहे. अत्यंत संथगतीने काम सुरु असल्याने पर्यायी उभरण्यात आला. पण आता हा पर्यायी पुल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मध्यरात्रीपासून मुख्य गावांशी संपर्क बंद आहे. काही नागरिक जीव मुठीत घेऊन पुरांच्या पाण्यातून येण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

Assembly Election: 'हरियाणा, काश्मीरमध्ये इंडिया आघाडी जिंकणार, महाराष्ट्रातही असंविधानिक सरकार पडणार', काँग्रेसला विश्वास

Marathi News Live Updates : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

Maharashtra Politics : राजकीय वारं उलटं फिरलं, शिंदे गटातून आउटगोईंग सुरु, कट्टर शिवसैनिक पुन्हा ठाकरेंकडे परतणार

Yoga: योगा केल्यावर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य?

SCROLL FOR NEXT