Nandurbar News : नदीवर पुल नसल्याने पुरातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास; पर्यायी मार्ग नसल्याचे अडचण

Nandurbar News : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर बोरवान गावाजवळून गेलेल्या नदीवर अदयाप पूल झालेला नाही. यामुळे पुरातून मार्ग काढावा लागत असतो
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बोरवाण गावात नदीला पूल नसल्याने येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी हि समस्या दरवर्षीच निर्माण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

Nandurbar News
Nandurbar News : राज्यातील सर्वात गरीब म्हणून नंदुरबार जिल्हा पाहिल्यास्थानी; नीती आयोगाच्या सर्वेक्षणाचा अहवाल

पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर बोरवान गावाजवळून गेलेल्या नदीवर अदयाप पूल झालेला नाही. यामुळे पुरातून मार्ग काढावा लागत असतो. परिणामी आरोग्याच्या मोठ्या समस्या देखील निर्माण होत असतात. गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागू शकतो. मात्र या गावांना (Nandurbar) जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने जीव धोक्यात घालून आदिवासी बांधव प्रवास करताना पाहायला मिळत आहेत.  

Nandurbar News
Beed News : युरिया साठ्यात तफावत, कृषी केंद्राचा परवाना निलंबित; बीडमध्ये कृषी विभागाची कारवाई

पूल मंजूर, कामाला विलंब 

गावकऱ्यांच्या मागणीनुसार बोरवान नदीवर पूल मंजूर करण्यात आला आहे. पण त्या मंजुरीला अनेक महिने उलटून देखील प्रत्यक्षात पुल बांधणीला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यात या गावकऱ्यांना आता मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. जर बोरवणीचा नदीला मोठा पूर आला; तर त्या परिसरातील दहा गावांच्या संपर्क तुटत असतो आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या देखील समस्या समोर येत असतात. अनेक महिने उलटून देखील या पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले असून गावाची समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा बीरसा आर्मीच्या वतीने देण्यात आलेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com