Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी गाजर आंदोलन; नागरिकांना वाटले गाजर

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
: अकोला शहरातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची इमारत तयार होऊन चार वर्ष उलटून गेली आहेत. परंतु अद्यापपर्यंत हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (Hospital) पूर्णपणे सुरु झालेले नाही. या हॉस्पिटल करीत आज (Akola) सामाजिक कार्यकर्त्यांनी गाजर आंदोलन केले. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना गाजर वाटप करून प्रशासनाचा निषेध केला. (Breaking Marathi News)

अकोला शहरात चार वर्षांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत बांधण्यात आली. तत्कालीन वैद्यकीय आरोग्य मंत्री यांनी सदरचे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल लवकरच सुरू करणार व या ठिकाणी रिक्त असलेली सगळी पदे तात्काळ भरण्यात येणार; असे आश्वासन दिले होते. मात्र तेव्हापासून तर आजपर्यंत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये फक्त ओपीडी सुरू करण्यात आली आहे. 

या ठिकाणच्या इतर वैद्यकीय सुविधा अद्यापही जिल्ह्यातील नागरिकांना मिळाल्या नसल्याने आज सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसमोर गाजर वाटो आंदोलन केले आहे. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल समोरून जाणाऱ्या नागरिकांना गाजर भेट देत आरोग्यमंत्र्यांसह राज्य शासनाचा निषेध केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT