अकोला : अकोल्यात डिझेलच्या होत असलेला काळाबाजार पोलिसांनी उध्वस्त केला. एकाला यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर ४०० लीटर डिझेलचा (Diesel) अवैध साठा जप्त केला आहे. (akola news Black market for diesel in Akola One accused arrested)
पोलिसांना अकोल्यातील (Akola) एमआयडीसी परिसरात डिझेलची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून एमआयडीसीत होत असलेल्या डिझेलच्या अवैध विक्री केंद्रावर छापा मारत ४०० लीटर डिझेलचा अवैध साठा जप्त केला. पोलिसांनी (Police) आरोपी राजेश देविदास दांडले (रा. कुंभारी) याला अटक केली. याच्याविरुद्ध एमआयडीसी (Akola MIDC) पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
घरात डिझेलचा छापा
पोलीस पथकाने बीके चौकातील एका घरावर छापा मारत घरात विनापरवाना साठवलेला ४०० लीटर डिझेलचा साठा जप्त केला. राजेश दांडले हा घरातून डिझेलची विनापरवाना विक्री करत होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.