Akot News Saam tv
महाराष्ट्र

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Akola News : मुंडगाव गावातीलच भाग असलेला अमिनापूर येथील चंद्रिका नदीला पूर आल्यामुळे या गावात येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. यामुळे येण्याजाण्याचा हा मार्ग बंद झाल्याने नागरिक गावात अडकले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : दोन- तीन दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात चंद्रिका नदीला पूर आल्यामुळे अकोल्यातील अमीनापूर या गावचा संपर्क तुटला असून शेकडो ग्रामस्थ गावातच अडकले आहेत. गावात जाणारे रस्ते बंद झाल्याने गावातील नागरिकांना निघता येणे कठीण आहे. 

अकोला जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान अकोट तालुक्यातल्या मुंडगाव ते अमिनापूर गावाचा रस्ता बंद झाला आहे. मुंडगाव गावातीलच भाग असलेला अमिनापूर येथील चंद्रिका नदीला पूर आल्यामुळे या गावात येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. यामुळे येण्याजाण्याचा हा मार्ग बंद झाल्याने नागरिक गावात अडकले आहेत. 

पूल उभारणीची मागणी 

मुंडगाव ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या अमिनापूर या ठिकाणी जवळपास २०० घर आहेत. अमिनापुर मधून मुंडगाव येथे येण्यासाठी हाच एक पर्याय रस्ता, जो चंद्रिका नदीतून जातो. नदीला पूर आल्यामुळे आज अमिनापूर गावचा गावचा संपर्क तुटला आहे. मुंडगाव ते अमिनापुरमध्ये असलेल्या चंद्रिका नदीवर पूल बांधण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसापासून गावकरी करत आहेत. मात्र अद्यापही गावकऱ्यांच्या सरकारच प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. 

दरवर्षी होतो रस्ता बंद 

दरवर्षी नदीला आलेल्या पुरामुळे अमिनापुर गावचा संपर्क तुटतो. त्यामुळे येथील गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतात. यंदाही रात्रीपासून या गावचा संपर्क तुटलेला आहे. अमिनापूर येथील गावकरी गावातच अडकून आहेत. तर काही गावकरी जवळपास पाच फूट पाण्यातून प्रवास करीत नदी क्रॉस करताना दिसून येत आहेत. अर्थातच नदीतून प्रवास करून या गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT