Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Nandurbar Akkalkuwa News : ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत रस्ता मंजूर होऊन निधी उपलब्ध असतानाही केवळ ७०० मीटरच काम पूर्ण झाल्याने स्थानिकांना आजही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे
Nandurbar Akkalkuwa News
Nandurbar Akkalkuwa NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्त्यांची समस्या हि नवीन राहिली नाही. यामुळे आरोग्य सेवा पोहचणे कठीण झाले आहे. अशात प्रसूतीच्या कळा सुरु झाल्याने महिलेला झोळीत टाकून नेण्यात येत होते. मात्र रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे शक्य नसल्याने माघारी फिरून घरी आणावे लागले. यानंतर या मातेची घरीच प्रसूती करावी लागल्याची धक्कादायक घटना नंदुरबार जिल्ह्यात समोर आली आहे. 

नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथे रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसूती कळा सुरू असताना रुग्णालयात पोहोचता न आल्याने एका गर्भवती मातेला घरीच बाळाला जन्म द्यावा लागला. विशेष म्हणजे, ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत रस्ता मंजूर होऊन निधी उपलब्ध असतानाही केवळ ७०० मीटरच काम पूर्ण झाल्याने स्थानिकांना आजही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Nandurbar Akkalkuwa News
Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

नदीला पूर आल्याने फिरावे लागले माघारी 

अक्कलकुवा तालुक्यातील मोठे तोलवापाडा येथील दमणीबाई ओल्या वसावे या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. झोळी करून त्यात महिलेला टाकून पायपीट करत प्रवास सुरु केला. परंतु रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था आणि रटवाई नदीला आलेल्या पुरामुळे त्यांना रुग्णालयात पोहोचणे अशक्य झाले. झोळीतून रुग्णालयात नेत असताना पुरामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. 

Nandurbar Akkalkuwa News
Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी पायपीट करत नेले रुग्णालयात 

घरी आणल्यानंतर दमणीबाईंची घरीच प्रसूती करावी लागली. तर प्रसूतीनंतर दुसऱ्या दिवशी नवजात बाळासह दमणीबाई यांना रुग्णालयात नेणे गरजेचे होते. यामुळे नाईलाजाने एका धोकादायक लाकडी पुलावरून ४ किलोमीटरची जीवघेणी पायपीट करत रुग्णालयात पोहोचावे लागले. सुदैवाने, माता आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com