Akola News News
महाराष्ट्र

Akola News : धक्कादायक! अकोल्यात खिचडीत पडली पाल, चिमुकल्यांसह 15 जणांना विषबाधा

या घटनेत खिचड़ी खाल्ल्याने 12 चिमुकल्यासह तीन महिलांना विषबाधा झाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola News : अंगणवाडीतील मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारात पाल पडल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सारकीन्ही गावात हा प्रकार घडला आहे. या घटनेत खिचड़ी खाल्ल्याने 12 चिमुकल्यासह तीन महिलांना विषबाधा झाली आहे. बाधित झालेल्या चिमुकल्यांसह महिलांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

आता सर्व बधितांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकिय अधिकारी इंगळे यांनी सांगितले. दरम्यान अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना (Student) पोषण आहार देण्यासाठी तांदळाची खिचडी शिजवायला टाकली, त्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्या खिचड़ीच्या पातेल्यात पाल पडली आणि तीच खिचडी मुलांना खायला दिली आणि त्यातून चिमुकल्यांना विषबाधा (Food Poison) झाली असल्याची माहिती आहे.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून या सर्व बधितांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थी दाखल करण्यात आले. दरम्यान, खिचडी बनवताना हलगर्जी करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी आता गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack Symptoms: गर्दीत घाबरल्यासारखं वाटतंय? असू शकतो पॅनिक अटॅकचा धोका, वेळीच ओळखा लक्षणं

Maharashtra Live News Update : कृषिमंत्र्यांकडून 'त्या' बातमीची दखल, 7 ऑक्टोबरला बोलावली बैठक

Team India: टीम इंडिया प्रॅक्टिस करत असतानाच मैदानात घुसला साप; खेळाडू झाले सुन्न

शिंदे सेनेच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, करमाळ्यातील शेतात मारलं, संशयाची संशय कुणाकडे?

OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या GR ला विरोध, वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT