Akola Muncipal Corporation Election 2025 - 26  Saam tv
महाराष्ट्र

Akola Muncipal Elections : अकोल्यात महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला किती जागा? वाचा

Akola Muncipal Corporation Election 2025 - 26 : विदर्भातील ४ महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढणार आहे. अकोल्यात २०१७ मध्ये जिंकलेल्या ६१ जागा सुरक्षित ठेवून उर्वरित १९ जागांचे वाटप ५५–१५–१० फॉर्म्युल्यानुसार होण्याची शक्यता आहे. अंतिम जागावाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • विदर्भातील ४ महापालिकांत महायुती एकत्र लढणार

  • १९ जागांचे वाटप ५५–१५–१० फॉर्म्युल्याच्या दिशेने

  • प्रभाग १७ मध्ये मैत्रीपूर्ण लढतीवरून तणाव

  • अंतिम यादी लवकरच जाहीर होणार

अक्षय गवळी, अकोला

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? याची वाटाघाटी एकमेकांसोबत सुरु असून, काही ठिकाणी राजकारणातील एकमेकांवरचे रुसवे फुगवे विसरून नेते मंडळींनी युती केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता विदर्भातल्या चारही महानगरपालिकांमध्ये 'महायुती' एकत्र निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

काल नागपुरात झालेल्या भाजप आणि शिंदे सेनेच्या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. अकोला महापालिकेतील महायुतीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला 'साम'च्या हाती लागला आहे. २०१७ मध्ये जिंकलेल्या आणि सध्या तिन्ही पक्षांच्या ताब्यात असलेल्या जागा त्याचं पक्षांच्या ताब्यात राहणार आहेत.

अकोला महापालिकेत २०१७ मधील ८० पैकी ४८ जागा एकट्या भाजपकडे. तर शिवसेनेला ८ जागा मिळाल्या होत्या, तसेच राष्ट्रवादीला ५ ठिकाणी विजय मिळाला होता. त्यामूळे तिन्ही पक्षांच्या ताब्यात असलेल्या ६१ जागा सोडून उर्वरीत १९ जागांचे तिन्ही पक्षांत वाटप होणार आहे. या १८ पैकी ७ ते ८ जागा शिंदे गटाला मिळणार असून ५ ते ६ जागा राष्ट्रवादीला मिळणार आहेत. भाजप ५५, शिंदे शिवसेना १५ आणि राष्ट्रवादी १० अशी जागा वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापर्यंत अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे.

मात्र, भाजप आणि शिंदे गटात प्रभाग क्रमांक १७ वर तिढा कायम आहे. या प्रभागात नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले शिंदेंचे महानगरप्रमुख राजेश मिश्रांच्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीवर भाजप ठाम आहे. तर २०१७ मध्ये या प्रभागात स्वत: राजेश मिश्रा, त्यांची पत्नी आणि दोन्ही समर्थक विजयी झाले होते . या सर्वांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत २५०० मते घेतली होती . राजेश मिश्रा यांनी हिंदुत्वादी मते घेतल्याने भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांचा १२८३ मतांनी पराभव झाला होता .

महायुतीतील संभाव्य जागा वाटपाचा फार्मूला :

भाजप : ५५

शिंदे सेना : १५

अजित राष्ट्रवादी : १०

अकोला महापालिकेतील पक्षीय २०१७ ची बलाबल :

एकूण जागा :८०

भाजप : ४८

काँग्रेस : १३

शिवसेना : ०८

राष्ट्रवादी : ०५

वंचित बहूजन आघाडी :०३

एमआयएम :०१

अपक्ष :०२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: एमआयएम जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार

Curly Hair Care Tips: कुरळ्या केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा स्टेप बाय स्टेप

एमआयएमचे ३३ नगरसेवक जिंकले, Imtiaz Jaleel यांच्यावर पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

EPFO Withdrawal Rule: रिटायरमेंटआधी कोणत्या कारणांसाठी काढू शकतात PFचे पैसे; वाचा EPFO चे नियम

रशियाशी मैत्री महागात पडली, अमेरिकेनं उलथवली 7 देशांची सत्ता

SCROLL FOR NEXT